वैष्णवांचा मेळा पाडेगावात विसावला

लोणंद, दि. 1 (वार्ताहर)- आपल्या परतीच्या प्रवासातील फलटण ते पाडेगाव असा मोठा टप्पा पार करून ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पाडेगाव मुक्कामी विसावला. बुधवारी सकाळी फलटण येथून निघालेला सोहळा संध्याकाळी पाचच्या सुमारास पाडेगावच्या वेशीवर टाळ मृदंगाच्या गजरात पोहचला. येथे पाडेगावच्या स्वागत कमानीपाशी माऊलींचे स्वागत पाडेगावच्या सरपंच स्मिताताईं खरात पाटील, पंचायत समिती सदस्या रेखाताई खरात पाटील, बाबासाहेब खरात, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव खरात, रूपालीताई मोहीते, प्रविण ढावरे, रोहिदास पिंगळे, तसेच पाडेगाव ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी व राजेश खरात, बिपीन मोहिते, नितीन जगताप, सूर्यकांत खरात, विनायक आबा खरात, प्रशांत अरविंद ढावरे, नाना ढावरे, राजेंद्र गोरे आदी मान्यवरांनी केल्या नंतर माऊलींच्या रथाला पाडेगावातील बैल जोडी जोडून टाळ मृदंगाच्या गजरात पाडेगाव शाळेच्या आवारात रथ पोहचला. गावकर्‍यांनी पालखी खांद्यावरून सभागृहात वाजत गाजत आणली. भाविकांना भोजनाची सोय करण्यात आली. मुक्कामानंतर उद्या सकाळी सातला सोहळा पुण्याच्या दिशेने रवाना होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)