वैविध्यपूर्ण प्रयोगांच्या सादरीकरणामुळे प्रदर्शन अविस्मरणीय

पिंपरी – संगणकाच्या सुट्या भागांची ओळख, ट्रॅफिक सिग्नलचे नियंत्रण, वेब पेज, पाणीपुरवठा अशा विविध प्रयोगांनी लक्ष वेधून घेतले.

निमित्त होते इन्फोटेक फाऊंडेशनने मोशीतील यशस्वी प्राथमिक विद्यालयात आयोजित केलेल्या संगणक प्रदर्शनाचे. बालवयातच विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख होऊन, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती समजावी, या हेतूने हे संगणक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध प्रोग्रॅमची निर्मिती कशाप्रकारे केली जाते,

वेबपेज निर्मिती, कापड निर्मिती व दैनंदिन व्यवहारात केला जाणारा संगणकाचा प्रभावी वापराची माहिती या प्रदर्शनात देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवकाते यांनी दैनंदिन जीवनातील संगणकाची गरज, यामुळे जीवनात होणारे बदल, आधुनिक तंत्रज्ञानामुळे सुकर झालेले जीवन याविषयी माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापिका शोभा देवकाते, आण्णासाहेब कानडे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सूर्यवंशी, छाया पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)