वैयक्तीक क्रीडा प्रकारात करिअर कारा – नरळे

पिरंगुट- सांघिक खेळाऐवजी तुम्हाला ज्या वैयक्तिक क्रीडा प्रकारात आवड आहे त्याततच करिअर करा. आई-वडिलांच्या प्रोत्साहानामुळे आज मी प्रगती करू शकले आहे. माझ्या यशात क्रीडा शिक्षकांचाही मोलाचा वाटा आहे. असे प्रतिपादन युवा आशियाई सूवर्ण पदक विजेती आंतरराष्ट्रीय धावपटू अवंतिका नरळे हिने केले. नुकत्याच हॉंगकॉंग येथे झालेल्या युवा आशियाई अथलेटिक्‍स क्रीडा स्पर्धेत 100 मीटर धावणे प्रकारात सूवर्ण पदक व 200 मीटर रिलेमध्ये रौप्य पदक मिळवले आहे. त्यानिमित्त पिरंगुट येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट इंग्लिश स्कुलच्या वतीने तिचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना अवंतिका बोलत होती.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सुनील लाडके, पर्यवेक्षिका दमयंती गायकवाड, अवंतिकाचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक शिवाजी म्हेत्रे, वडील संतोष नरळे, शहाजी ढेकणे आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. अवंतिकाने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 10 सूवर्णपदकांची कमाई केली आहे. ती पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या लोणकर विद्यालयात इयत्ता 10 वी मध्ये शिकत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एम. खराडे, प्रास्ताविक प्राचार्य सुनील लाडके तर पर्यवेक्षिका दमयंती गायकवाड यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)