वैभव तत्त्ववादीचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

मराठी व हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता वैभव तत्त्ववादी याने आता,आपल्या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे. त्याच्या प्रत्येक सिनेमातील अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. वैभवचा अभिनयापासून सुरू झालेला प्रवास हा त्याला निर्मिती क्षेत्राकडे घेऊन आला म्हणूनच त्याने आपले ‘ऑटम ब्रीझ फिल्मज्’ अशी नवीन निर्मिती संस्थेचे स्थापना केली आहे. या संस्थेमार्फत सिनेमाची निर्मिती ते व्यवस्थापन अशी सर्वच कामे केली जाणार आहेत.

याशिवाय वैभवचा ‘मणिकर्णिका : द क्कीन ऑफ झाँसी’ हा सिनेमासुद्धा येत्या नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये वैभव तत्त्ववादी एका नवीन लुक मध्ये दिसून येणार आहे. या सिनेमामध्ये लक्ष्मीबाई यांच्या लढाऊ तुकडीतील योद्धा पुरणसिंगची व्यक्तिरेखा त्याने साकारली आहे. यामध्ये वैभवच्या बायकोची झलकारी बाईची भूमिका अभिनेत्री अंकिता लोखंडेने साकारली असून या जोडीवर एक गाणंही चित्रित करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)