वैध व्हिसा नसल्याने ब्रिटिश खासदाराला नाकारला प्रवेश

नवी दिल्ली : ब्रिटनचे नागरिक लॉर्ड अलेक्झांडर कार्लिली यांना वैध व्हिसा नसल्याने भारतात प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती विदेश मंत्रालयाने दिली आहे. कार्लिली हे बांगलादेशातील विरोधी पक्ष नेत्या खलिदा झिया यांचे वकील असून ते नवी दिल्ली येथे गुरुवारी पत्रकार परिषद घेणार होते. युनायटेड किंग्डमच्या वरिष्ठ सभागृहाचे ते सदस्य आहेत.

व्हिसा अर्जात नमूद भेटीच्या उद्देशाशी त्यांची भारतातील प्रस्तावित पत्रकार परिषद संबंधित नसल्याने कार्लिली यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. 11 जुलै रोजी अलेक्झांडर कार्लिली हे नवी दिल्ली येथे दाखल झाले, परंतु त्यांच्याकडे वैध भारतीय व्हिसा नव्हता. व्हिसा अर्जात नमूद भेटीच्या उद्देशाशी फारकत घेणारे कृत्य ते करणार असल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)