वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठे केंद्र : कराड (भाग 2)

आनंद जगदाळे

पुणे-मुंबई बरोबर वैद्यकीय सुविधा देण्यात कराड अग्रेसर आहे. या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील पाटण, खटाव, फलटण व सांगली जिल्ह्यातील वाळवा, इस्लामपूर, पलूस, कडेपूर, कडेगाव या परिसरातील लोक मोठ्या संख्येने येत असतात. वरील परिसरातील एखाद्या ठिकाणी मोठा अपघात झाला तर लोक कराड हेच मध्यवर्ती ठिकाण मानूून या ठिकाणीच येतात. कराड जशी एक मोठी बाजारपेठ आहे, त्याचप्रमाणे ते वैद्यकीय क्षेत्रातीलही एक मोठे केंद्र बनले आहे.

सह्याद्री हॉस्पिटल

वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा ठरलेल्या कराड येथील सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात. अद्ययावत सेवेचा लाभ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा, हे सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलचे ध्येय आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी रुग्णालय श्रृंखला असलेल्या कराडमधील सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल सुमारे 1 लाख स्क्वेअर फूट परिसरात विस्तारलेले आहे. या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात सर्व प्रकारच्या अद्ययावत सोयीसुविधा आहेत. कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर भागातील लोकांना आरोग्य विषयक सुविधा व वैद्यकीय उपचार या रुग्णालयाच्या माध्यमातून आता अद्ययावत रूपात सहज उपलब्ध होत आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठे केंद्र : कराड (भाग 1)

 

सर्वसामान्य लोकांना परवडेल, अशा दरात या ठिकाणी उपचाराच्या अद्ययावत सुविधा आहेत. कराड व नजीकच्या परिसरातील रुग्णांना ह्रदयरोगावरील उपचारासाठी आता पुणे-मुंबई येथे जाण्याची आवश्‍यकता भासत नाही. सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथे अद्ययावत कॅथलॅब मध्ये पुणे येथील ह्रदयरोग तज्ज्ञांच्या देखरेखेखाली ह्रदयरोग उपचार सुविधा उपलब्ध आहेत. गुंतागंतीच्या परिस्थितीत सह्याद्री हॉस्पिटलच्या पुणे शाखेकडून संकटकाळी मदतही उपलब्ध करण्यात येते. नामवंत ह्रदयरोग तज्ज्ञांचे उपचार येथे उपलब्ध आहेत. समाजाला उच्च दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करण्याच्या हेतूने सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नवनवीन सुविधा व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देत आहे. अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स, अत्यावश्‍यक सेवा तज्ज्ञांच्या तैनाती, 29 खाटांचा अतिदक्षता विभाग, सात खाटांचा नवजात अर्भक अतिदक्षता विभाग, पॅथॉलॉजी सेवा, रेडिओलॉजी व इतर निदान सुविधा, लिथोट्रिप्सी (मूतखड्यावरील उपचार) कॅथ लॅब आदी सुविधांचा समावेश सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आहे. डिजिटल एक्‍स रे सीटी स्कॅन, डेक्‍सास स्कॅन, (बोन मिनरल डेन्सिटी), सोनोग्रफी, ईसीजी, 2 डीइको, स्ट्रेस टेस्ट, ऑडिओ मेट्री, (श्रवण चाचणी), पल्मोनरी फंक्‍शन टेस्ट, (पीएफटी-फुफुसांची क्षमता चाचणी), फिजीओ थेरपी, डायलिसीस, प्रतिबंधात्मक चाचणी, (हेल्थ चेकअप पॅकेजेस). सांधे बदल व मणक्‍याची शस्त्रक्रिया, ह्रदय चिकित्सा, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, नवजात अर्भक चिकित्सा, न्यूरॉलॉजी व न्यूरोसर्जरी मेडिकल ऑन्कॉलॉजी व ऑन्को सर्जरी, प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी, वंध्यत्व निदान व उपचार कृत्रिम गर्भधारणा गॅस्ट्रो इन्टेरॉलॉजी, फिजिशीयन चेकअप, अपघात व ट्रॉमा केअर अस्थिचिकित्सा स्त्रीरोग व प्रसूती जनरल सर्जरी, त्वचाविकार, नेत्रचिकित्सा, बालरोग, मधुमेह चिकित्सा कान, नाक, घसा चिकित्सा सुमारे 1 लाख स्क्वेअर फुटाच्या परिसरात विस्तारलेले असून सर्व स्पेशालिस्ट व सुपर स्पेशालिस्ट एकाच छताखाली उपलब्ध आहे.

मोबाईल आरोग्य सेवा
कराड व परिसराची सर्वच क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. याला वैद्यकीय क्षेत्रही अपवाद नाही. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्षेत्राबरोबरच वैद्यकीय क्षेत्रातही नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. पुणे-मुंबई या ठिकाणी ज्या पध्दतीने मोबाईल आरोग्य सेवा दिली जाते, त्या पध्दतीने कराडमध्येही सात-आठ ठिकाणी मोबाईल आरोग्य सेवा उपलब्ध आहे. रुग्णांना ने-आण करण्यासाठी व त्यांच्या घरी पोच करण्यासाठीची सोयही उपलब्ध झाली आहे. 1980 ते 1990 दरम्यान लोक ठराविक एकाच वैद्यकीय केंद्रात जात असत. मात्र आता पुणे-मुंबईप्रमाणे लोकांचीही मानसिकता बदलली आहे. फॅमिली डॉक्‍टर ही संकल्पना रुढ झाली आहे. एक कुटुंब एक वैद्यकीय केंद्र या नवीन प्रथेस कराड व ग्रामीण भागातील लोकांनी स्वीकारले. सर्वच रोगावर निदान करणाऱ्या वैद्यकीय केंद्रापेक्षा स्पेशालिटीवर लोक भर देत आहेत.

कान, नाक, घसा, फॅक्‍चर, ह्रदय, ब्रेन, कॅन्सर, प्लास्टिक सर्जरी आदी प्रकारचे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडेच लोक जातात. पुणे-मुंबईप्रमाणे आता कराडमध्येही प्लास्टिक सर्जरी, केशरोपण, टेस्ट ट्यूब बेबी आदींवर उपचार होऊ लागले आहते. कराड शहरात मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधामुळे लोकांना पुणे-मुंबई या ठिकाणी न जाता कराड मध्येच सर्व प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)