वैद्यकीय उपचारात सामग्रीचा पुन्हा वापर होत असल्यास कारवाई

         अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांची माहिती

मुंबई – वैद्यकीय उपचार करताना महत्वाच्या प्रक्रियेमध्ये वापरलेल्या सामग्रीचा पुन्हा वापर करुन गरीब माणसाच्या जीवाशी कोणी खेळत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कोणालाही क्षमा केली जाणार नाही, असे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

खासगी रुग्णालयात ॲन्जीओप्लास्टीसारख्या हृदयरोगातील महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये एकदा वापरलेल्या सामग्रीचा पुन्हा वापर होत असल्याबाबत सदस्य जयवंतराव जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना येरावार म्हणाले, अन्न व औषध प्रशासन विभागाने रुग्णालयाची तपासणी करण्याची स्वतंत्र मोहीम हाती घेतली होती. यामध्ये दोषी आढळलेल्या रुग्णालयांवर १८ (सी) अंतर्गत खटले दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयातील खटल्यांचा पाठपुरावा सुरु आहे. कुठल्या रुग्णालयात १० टक्के कोट्याअंतर्गत किती खाटा उपलब्ध आहेत याबाबत ऑनलाईन माहिती मिळते. रुग्णालयाच्या आवारात आरोग्यसेवक नेमले आहेत. जी रुग्णालये नियमानुसार गरीब रुग्णांना सेवा देत नसतील तर अशा रुग्णालयांच्या सवलती काढून घेऊ, असेही  येरावार यांनी यावेळी सांगितले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)