वैदिक विचार प्रतिष्ठानच्यावतीने2 ते 11 मे निवासी शिबीर

नगर – वैदिक प्रतिष्ठानचे विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण असलेले निवासी शिबीर येत्या 2 मे ते 11 मे दरम्यान अग्नेय गुरुकुल मेहेराबाद फुड पार्क हॉटेल मागे अरणगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीराचे वैशिष्ट्‌ये म्हणजे हरीयाणा, हरिव्दार येथील गुरुकुलाचे आचार्य विद्यार्थ्यांना प्राणायाम, योगासन भारतीय व्यायामाचे अनेक प्रकार, कराटे, लाठीकाठी, तलवारबाजी, रायफल शिकवुन त्यामध्ये प्रविण्य मिळवून देतील. मुलांच्या उंची, वजन, वाढ इ. समस्या दूर करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देखील देणार आहेत. शिबिरामध्ये अनेक प्रकारचे खेळ तसेच खेळासंबधीचे योग्य मार्गदर्शन दिले जाणार आहेत.
व्यक्तिमत्व विकास, बौद्धीक प्रगती, स्मरणशक्ती वाढ, आत्मिक विकास, शैक्षणिक प्रगती आणि करिअर मार्गदर्शन, टी.व्ही संगणक, मोबाईल याचा सदुपयोग, आहाराचे मार्गदर्शन आणि चरित्र निर्माण अश्‍या अनेक विषयांमध्ये कौशल्य प्राप्त करुन देत असतांना अनेक मनोरंजक कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखविले आणि शिकविले जाणार आहेत.
शिबिरामध्ये प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांना स्पोर्टस ड्रेस, स्पोटस शुज, सॉक्‍स, साबण, तेल, वह्या, पुस्तके शिबिर साहित्य मोफत दिले जाणार आहेत. पालकांना फक्त (सकाळाचा नाष्टा, दोन वेळसचे जेवण, फळे, ज्युस आणि दुध साठीचे) केटसर्सचे पैस भरावे लागणार आहेत. शिबीरासाठी मार्यादित जागा असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राध्यान्य ह्या पद्धतीने प्रवेश देण्यात येईल. विद्यार्थी 4 वीच्या पुढील असावा. अधिक माहितीसाठी 9689122005, 9226458737, 9423950565 या क्रमांकास संपर्क साधवा.
प्रवेश अर्ज मिळण्याचे ठिकाण:- 1. जलाराम बेकर्स, बंगाल चौकी आणि केडगाव, नगर, 2. एक्‍सेल कॉम्प्युटर, चाणक्‍य चौक, बुरुड गाव , नगर, 3. लकी ऑप्टीकल्स, कापड बाजार, नगर, 4. कुबेर मार्केट, सर्जेपुरा, नगर, 5. लोटसस्वेअर मेडीकल, गुलमोहर रोड, अ.नगर, 6.मनोज भंडारी सप्लायर्स, पाईपलाईन रोड, नगर 7. शुभम मेडिकल, दिल्लीगेट नगर,


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)