वैदवस्ती, खेबडेमळा येथे विकासकामे सुरू

नारायणगाव- जिल्हा परिषद पुणे आणि ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वैदवस्ती येथील अंतर्गत ड्रेनेज लाइनचे भूमिपूजन व खेबडेमळा अंतर्गतरस्ता खडीकरण उदघाटन कार्यक्रम झाल्याची माहिती सरपंच योगेश पाटे यांनी दिली .
वार्ड क्रमांक 3 मधील वैदवस्ती येथील बंदिस्त गटार लाइनचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित प्रश्न त्यासाठी 21 लक्ष रुपये व खडीकरणासाठी 3 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जि. प. सदस्या आशा बुचके यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख माउली खंडागळे, वि. सा. संचालक संतोष खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे, पं. स. सदस्य अर्चना माळवदकर, सरपंच योगेश पाटे, उपसरपंच संतोष दांगट, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, शिवसेना शहर प्रमुख अनिल खैरे, उपशहर प्रमुख हेमंत कोल्हे, मांजरवाडी तंटामुक्ती अध्यक्ष संदीप मुळे, ग्रामसदस्य सारिका डेरे, अनिता कसाबे, अश्विनी ताजने, आरिफ आतार, गणेश पाटे, राजेश बाप्ते, आशिष माळवदकर, भाग्येश्वर डेरे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)