‘वैज्ञानिक क्षेत्रामुळेच जीवनात मोठा बदल घडला’

एरोस्पेस वैज्ञानिक विजय सुलाखे, वैज्ञानिक कार्यशाळेचे आयोजन

नगर – ‘आज जगात वैज्ञानिक क्षेत्रामुळे फार प्रगती झाली आहे, अनेक बदल घडले, विविध प्रकारचे शोध घेतले गेले आणि अनेक नवीन गोष्टी जगासमोर आल्या. प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला, नागरिकाला, महिलांना वैज्ञानिक क्षेत्रातील माहिती असलीच पाहिजे. माहिती असली तर प्रत्येक नागरिक आपली प्रगती करू शकतो. वैज्ञानिक क्षेत्रामुळे आजच्या मनुष्याचे जीवन सोपे, सुखद, राजेशाही झाले आहे. या बाबीला कोणीच टाळू शकत नाही की, वैज्ञानिक क्षेत्रामुळेच मोठा बदल घडला आहे,” असे प्रतिपादन एरोस्पेस वैज्ञानिक विजय सुलाखे यांनी केले.

फनडू टॉईजतर्फे रविवार, दि. 16 रोजी लहान मुलांसाठी वैज्ञानिक कार्यशाळेचे आयोजन नगर येथील जिल्हा वाचनालय, लोकमान्य टिळक सभागृह येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एरोस्पेस वैज्ञानिक विजय सुलाखे होते. या प्रसंगी जिल्हा वाचनालयाचे शिरीष मोडक, किरण अगरवाल, सनी वधवा, गगन वधवा, अभिजित भळगट उपस्थित होते.

या कार्यशाळेचा उद्देश लहान मुलांमध्ये वैज्ञानिकविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांना वैज्ञानिक क्षेत्रात काय असते हे कळावे यासाठी केमिकल इंजिनिअरिंग, फिजिक्‍स हे दोन विषय घेण्यात आले होते. याआधी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा ठिकाणी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. इ. 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 10 ते 11.30 आणि इ. 9 वी ते 12 वी या विद्यार्थ्यांसाठी 12 ते 1.30 पर्यंत कार्यशाळा घेण्यात आली. या वैज्ञानिक कार्यशाळेच्या आयोजकांतर्फे विद्यार्थ्याना वैज्ञानिक किट दिल्या होत्या. त्याच्या साहाय्याने मुलांनी वैज्ञानिक प्रयोग केले व प्रयोग करताना नवीन गोष्टी आनंदाच्या वातावरणामध्ये त्यांना शिकायला मिळाल्या. या कार्यशाळेला मुलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)