वैज्ञानिक उपक्रमांची निर्मिती करणे काळाची गरज : साळुंखे

वाठार – विद्यार्थ्यांनी आपली जिज्ञासूवृत्ती जागृत करावी.व वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करून उत्कृष्ठ वैज्ञानिक उपक्रमांची निर्मिती करणे काळाची गरज आहे, असे मत कराडच्या गटशिक्षणाधिकारी सौ.उषा साळुंखे यांनी व्यक्त केले.
वाठार येथील दानशूर बंडो गोपाळा मुकादम विद्यालयात वाठार येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास उत्साहात सुरूवात झाली. सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती कराड यांच्या संयुक्त विद्यमाने वाठार येथील दानशुर बंडो गोपाळा मुकादम विद्यालय व वसंतराव ऊर्फ डी.के. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, येथे यंदाचे 44 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सभापती सौ.शालन माळी होत्या.

तसेच यावेळी जनता बॅंक कराडचे चेअरमन राजेश पाटील, गटशिक्षणाधिकारी उषा साळुंखे,सातारा जिल्हा परिषदेचे विस्तारअधिकारीश्रीकांत जगदाळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे, विस्तार अधिकारी आनंद पळसे, वाठारच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष अधिकराव पाटील, प्रभाकर चव्हाण, रमेश पाटील, सौ. रोहिणी देशमुख, आर. बी. जाधव, तसेच सर्व केंद्रांचे मुख्याध्यापक,शिक्ष विद्यार्थी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रास्ताविक प्राचार्य शरद कांबळे यांनी केले. यामध्ये त्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत केले.तसेच विस्तारअधिकारी जगदाळे यांनी विज्ञानाच्या विविध शोधकार्याचा आढावा सांगितला, आनंद पळसे यांनी सहभागी शाळांना मार्गदर्शन केले. शालन माळी.सचिन नलवडे यांचीहि भाषणे झाली.या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटातून साठ उपकरणे,व माध्यमिक गटातून 58व शिक्षक गटातून 10 उपकरणे सहभागी झाले आहेत. आभार बा पा.पाटील यांनी
केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)