वेस्ट इंडीज विरुद्ध अध्यक्षीय संघा दरम्यानचा सामना अनिर्णीत

दुसऱ्या दिवस अखेर इंडीजच्या 7 बाद 366

बडोदा: सुनिल अंबरिसचे नाबाद शतक आणि शेन डाऊरिच आण्इ कार्लोस ब्रेथवेटच्या तडाखेबाज अर्धशतकांच्या बळावर वेस्ट इंडिजने दोन दिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी 7 बाद 366 धावा करत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले.

अध्यक्षीय संघाने पहिल्‌;या दिवशी केलेल्या 360 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजच्या संघाने दुसऱ्या दिवशी आपल्या डावाला सुरुवात केली. यावेळी कार्लोस ब्रेथवेट आणि किरॉन पॉवेल यांनी सावधपणे फलंदाजी करताना संघाला चांगली सुरुवात करुन दिली. यावेळी ब्रेथवेटने आपले अर्धशतक पुर्ण केल्यानंतर निवृत्त होत पुढील फलंदाजांना सरावाची संधी दिली. ब्रेथवेटने 52 धावा केल्या तर पॉवेलही 44 धावांवर असताना निवृत्त झाला. यानंतर आलेल्या शाय होप आणि हेथमायर यांना चमक दाखवता आली नाही. होपने 36 तर हेथमायरने 7 धावा केल्या. तररोस्टॉन चेसही स्वस्तात परतला. यानंतर शेन डाऊरिचने आपले अर्धशतक पुर्ण करताना संघाला 20 धावांचा टप्पा गाठुन दिला. तर, सुनिल अंबरिशने जहमर हॅमिल्टन (23) च्या साथीत संघाला 300 धावांचा टप्पा गाठुन दिला तर किमो प्उल (0), जोएल वॅरिकन (9) आणि शर्मन लेविस (नाबाद 8) यांच्या साथीत संघाला 366 धावांपर्यंत मजल मारुन दिली. यावेळी सुनिल अंबरिसने 98 चेंडूंम्जध्ये 17 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 114 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, सामन्याच्या पहिल्या दिवशी अंकित बावणेचे नाबाद शतक आणि मयंक आगरवालची शानदार खेळीमुळे पहिल्या दिवसअखेर अध्यक्षीय संघाने आपला पहिला डाव 6 बाद 360 धावांवर घोषित करून पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजविले. कर्णधार करुण नायरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी स्वस्तात परतल्याने अध्यक्षीय संघाची दोन बाद 40 अशी अवस्था झाल्यामुळे हा निर्णय त्यांच्या अंगलट आला होता. नायर आणि आगरवाल यांनी संघाला शंभरी पार करून देताना शतकी भागीदारीकडे वाटचाल केली. मात्र, संघाच्या 132 धावा झाल्या असताना मयंक आगरवाल बाद झाला. आगरवालने 111 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 90 धावांची खेळी करताना नायरच्या साथीत 20.4 षटकांत 92 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. नायरने 60 चेंडूंत 29 धावांची खेळी केली.

जम बसवलेली जोडी तंबूत परतल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अंकित बावणे यांनी संघाचा डाव सावरला. यावेळी अय्यरने वेगवान, तर बावणेने सावध फलंदाजी करत संघाला 200 धावांचा टप्पा पार करून दिला. तसेच अय्यरने आपले अर्धशतक पूर्ण करताना संघाला 250 धावांचा टप्पा गाठून दिला. मात्र, संघाच्या 258 धावा झाल्या असताना अय्यरला बाद करत बिशूने ही जमलेली जोडी फोडली. त्यानंतर अय्यरने 64 चेंडूंत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 61 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करताना बावणेच्या साथीत 25.2 षटकांत 113 धावांची भागीदारी केली. बावणेने एक बाजू लावून धरताना आपले शतक पूर्ण केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी अध्यक्षीय संघाने आपला डाव 90 षटकांत 6 बाद 360 धावांवर घोषित केला. वेस्ट इंडीजकडून देवेंद्र बिशूने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर शेनॉन गॅब्रिएलने दोन गडी बाद करताना त्याला सुरेख साथ दिली.

संक्षिप्त धावफलक –
अध्यक्षीय संघ – पहिला डाव – 90 षटकांत 6 बाद 360 घोषित (अंकित बावणे नाबाद 116, मयंक आगरवाल 90, श्रेयस अय्यर 61, देवेंद्र बिशू 104-3, शेनॉन गॅब्रिएल 41-2, शेर्मन लुईस 13-1). वेस्ट इंडीज पहिला डाव 7 बाद 366 घोषित (सुनिल अंबरिस नाबाद 114, शेन डाऊरिच 65, कार्लोस ब्रेथवेट 52, किरॉन पॉवेल 44, शाई होप 36 अवेश खान 60-4, सौरभ कुमार 126-2 , जलज सक्‍सेना 95-1).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)