वेस्ट इंडिजला हरवून अफगाणिस्तान ठरला वर्ल्ड कप क्वालिफायरचा विजेता… 

हरारे : प्रामाणिक प्रयत्न केल्यास एक दिवस नक्कीच तुम्हाला यश मिळतं, हे आज अफगाणिस्तानच्या संघाने दाखवून दिलंय. वेस्ट इंडिजला हरवून अफगाणिस्तान वर्ल्ड कप क्वालिफायरचा विजेता ठरलाय. वर्ल्ड कप क्वालिफायर मधील सुरुवातीचे दोन्ही सामने हरल्यानंतर पुन्हा भरारी घेत अफगाणिस्तान संघाने हे यश खेचून आणलं आहे. आजच्या वर्ल्ड कप क्वालिफायरच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

अफगाणिस्तानच्या संघाने २०४ धावांमध्ये वेस्ट इंडिजला ऑल आऊट केलं. यामध्ये मुजीब रहमान याने ४ विकेट्स घेत महत्वाचा वाटा उचलला. २०५ धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघाने ४०.४ ओव्हर्स मध्ये ३ गड्यांच्या बदल्यात २०६ धावा करत हा सामना जिंकला आणि वर्ल्ड कप क्वालिफायर मध्ये अंतिम विजेता ठरला. मोहम्मद शहजाद याने ८४ धावा करत विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला. वेस्ट इंडीज आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ २०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कप साठी क्वालिफाय झाले आहेत. ‘हम भी किसी से काम नही’ असं म्हणत पुढील वर्षी इंग्लंड मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप साठी अफगाणिस्तान संघाने आजचा सामना जिंकत इतर संघांना चॅलेंज दिलंय असं म्हणायला हरकत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)