वेस्ट इंडिजचा पहिला डाव १८१ धावांवर संपुष्टात, फॉलोऑनची नामुष्की

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या १८१ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली   भारतीय संघाने पहिल्या डावात ६४९ धावांचा डोंगर उभारला होता.

वेस्ट इंडिजकडून रस्टन चेज (५३), किमो पॉल (४७) आणि देवेंन्द्र बिशू ( १७ )वगळता अन्य फलंदाज वयक्तिक १० धावांपेक्षा जास्त धावा बनवू शकले नाहीत.  तत्पूर्वी भारताकडून पृथ्वी शॉ, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी शतके ठोकली होती तर चेतेश्वर पुजारा(८६), रिषभ पंत(९२) यांनी अर्धशतके केली होती.

-Ads-

भारतासाठी आर. अश्विन ४ बळी मिळवले.  मोहंमद शमी याने २ गडी  बाद केले. तर रवींद्र जडेजा,कुलदीप यादव आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. वेस्ट इंडिजचा एक फलंदाज डाव बाद झाला होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)