वेश्‍या व्यवसायप्रकरणी दिघीत हॉटेलवर कारवाई

पिंपरी – वेश्‍या व्यवसाय सुरु असलेल्या दिघी येथील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा मारून सात मुलींची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 12) आळंदी-मोशी रोड डुडुळगाव येथील आमंत्रण लॉजिंग या हॉटेलवर करण्यात आली.

विजय बबन शिवले (वय-41, रा. डुडुळगाव, आळंदी) आणि वैजनाथ नरहरी बाबर (वय-27, रा. देहूफाटा, मोशी रोड, आळंदी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मॅनेजर वैजनाथ हा मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्‍या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत होता. याबाबत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना पोलीस हवालदार रमेश लोहकरे यांच्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखेचा सामाजिक सुरक्षा विभाग आणि दिघी पोलीस यांनी संयुक्तपणे आमंत्रण लॉजिंग या हॉटेलवर छापा मारला. कारवाईत तीन हजार रुपये रोख रक्कम, दोन मोबाईल फोन आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच कारवाईत लॉजमधील 7 मुलींची सुटका करण्यात आली. त्यांना मोशी येथील चैतन्य रेस्क्‍यू होम येथे ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)