वेळ नदीवरील पुलाचे कठडे गायब

शिक्रापूर- येथे असलेल्या पुणे-नगर या राष्ट्रीय महामार्ग असलेल्या रस्त्यावरील वेळ नदीवरील पुलाच्या कठड्यांची दुरवस्था झाली असून काही ठिकाणी कठडे गायब झाले असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथून जाणार पुणे-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर वेळ नदीवर दोन मोठे पूल आहेत;परंतु येथील एका पुलाची मर्यादा संपली असून इंग्रज कालीन पूल असल्यामुळे हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे, त्यामुळे येथील एकाच पुलावरून संपूर्ण वाहतूक केली जात आहे. परंतु येथील पुलाच्या कठड्यांना अनेकदा वाहने धडकल्याने या पुलाच्या कठड्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी पुलाचे कठडे तुटून खाली पडले आहेत, त्यामुळे येथील पुलाचा काही भाग मोकळा झाला आहे. या रस्त्यावरून अनेक पादचारी, चारचाकी तसेच दुचाकी व अवजड वाहनांची वाहतूक होत असते अनेकदा वाहनाच्या वेगामुळे येथे अपघात देखील घडलेले आहेत. तर येथील पुलाचे पूल सुरु होतानाच असलेले कठडे गायब आहेत तसेच ज्या ठिकाणी कठडा तुटला आहे त्या ठिकाणी कसलाही आधार नाही आणि खाली पूर्णपणे मोठा खड्डा आहे, तसेच या पुलाची दुरवस्था झाल्यामुळे या पुलावरून अपघात होऊन वाहने खाली कोसळण्याची दाट शक्‍यता असल्यानेया पुलावर कठडे बसविण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

या पुलाची पाहणी केलेली असून येथे पुलाच्या तुटलेल्या कठड्याचा भाग लवकरच दुरुस्त करणार आहे.
-गोरक्ष गवळी, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)