वेळेत बदल करून एसटी सेवा सुरू करण्याची मागणी

डोणी व घाटेवाडी ग्रामस्थांच्यावतीने सातारा आगारप्रमुखांना निवेदन

ठोसेघर – पाटण तालुक्‍यातील दुर्गम भागातील बंद केलेली डोणी, घाटेवाडी, एसटी सेवा वेळेत बदल करून त्वरित पूर्ववत सुरू करण्याची मागणी रासपचे तालुका अध्यक्ष नवनाथ जरग यांनी डोणी व घाटेवाडी ग्रामस्थांच्यावतीने राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातील अधिकाऱ्यांना केली आहे. सातारा-पाटण तालुक्‍यांच्या सीमेवर पाटण तालुक्‍यातील दुर्गम भागात असणाऱ्या डोणी, घाटेवाडी या गावापर्यंतची एसटी सेवा गेल्या काही महिन्यांपासून बंद केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या एसटी बस ही मोरेवाडी पर्यंतच येत असल्यामुळे त्याचबरोबर इतर कोणतेही दळणवळणाचे साधन उपलब्ध होत नसल्यामुळे आजारी रुग्ण, वृद्ध, विद्यार्थी दैनंदिन प्रवास करणाऱ्या डोणी, घाटेवाडीतील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तर येणाऱ्या एसटीची वेळीही नागरिकांसाठी सोयीची नसल्यामुळे एसटीच्या वेळापत्रकात बदल करून डोणी, घाटेवाडीपर्यंत एसटी सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी संजय कदम सरपंच घाटेवाडी, अनिल जाधव, काशिनाथ जरग, बाळू खरात, गौरव खरात, प्रज्ञा पंडित, विद्या गाढवे, विकास खरात, सचिन पवार उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)