वेळेत कर्जफेड हिताची असते – डॉ. येळगावकर

वडूज : सी एम पाटील यांना रोलरच्या चाव्या प्रदान करताना प्रदीप शेटे समवेत डॉ येळगावकर, श्री माळी व इतर(छाया:-नितीन राऊत)

वडूज, दि. 13 (प्रतिनिधी)- कर्जदारांनी कर्जफेड वेळेत केली तर ती संबंधित व्यक्ती व संस्था अशा दोन्ही बाजूस हिताची असते, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी केले. वडूज येथे तुळजाभवानी उद्योग समूहाचे संस्थापक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सी. एम. पाटील यांना कराड अर्बन बॅंकेच्या वतीने देण्यात आलेल्या रोलरच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. स्थानिक सल्लागार प्रदीप शेटे, माजी सरपंच अनिल माळी, भरत माळी, श्रीकांत राऊत, शाखा प्रमुख संजय सवानंद, विजय शिंदे, बाळासाहेब मासाळ, राजेंद्र चव्हाण, धनंजय क्षीरसागर, नितीन गोडसे, निलेश पवार, राजेंद्र गोडसे, संजय देशमुख, लालासाहेब गोडसे यांची उपस्थिती होती.
डॉ. येळगावकर म्हणाले, व्यावसायिकांनी कर्जाचा वापर योग्य पद्धतीने केल्यास संबंधित उद्योगाची चांगल्या प्रकारे भरभराट होते. तसेच कर्ज भरण्यास टाळाटाळ केल्यास त्याचा सर्वांनाच त्रास होतो. यावेळी त्यांनी तुळजाभवानी उद्योग समुहाने अल्पावधीत केलेली प्रगती तसेच कराड अर्बनने दुष्काळी भागास चांगल्याप्रकारे केलेल्या मदतीचे कौतुक केले.
सागर पाटील यांनी स्वागत केले. आकाश पाटील यांनी आभार मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)