वेळेत उपचारानेकॅन्सर पूर्णबरा होतो : डॉ. गरुड

मोफत सर्वरोग निदान शिबिर
जामखेड – समाजात आजही कॅन्सर आजाराबाबत गैरसमज आहेत. अशा आजारांकडे दुर्लक्ष न करता लवकर उपचार करावेत. लवकर उपचार केल्यास कॅन्सर पूर्णपणे बरा होतो, असे मत कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रकाश गरुड यांनी व्यक्‍त केले.
रोटरी क्‍लब ऑफ जामखेड, रोटरी नगर मिडटाऊन व गरूड कॅन्सर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनेशनिवारी मोफत सर्वरोग निदान शिबिरात तेबोलत होते. रोटरी अहमदनगर मिड टाऊनचे अध्यक्ष अभय राजे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौतम उतेकर, संचालक मकरंद काशीद, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष मंगेश आजबे, लक्ष्मण भोरे, कुसडगावचेसरपंच दादासाहेब सरनोबत, जामखेड रोटरी क्‍लब चेअध्यक्ष महादेव डुचे, डॉ. ज्ञानेश्‍वर झेंडे, विनोद राऊत, सचिन भंडारी आणि जामखेड रोटरी क्‍लबचेसर्वसदस्य यावेळी उपस्थित होते.
डॉ. प्रकाश गरुड, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गाडेकर, जनरल फिजिशियन डॉ. जितेंद्र ढवळे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल चौधरी, त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. अमित शिंदे, स्रीरोग तज्ज्ञ डॉ. पद्मजा गरुड, दंतरोग तज्ज्ञ डॉ. विनोद मोरे, डॉ. ओंकार कुलकर्णी, नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. अशोक गायकवाड यांनी रुग्णांची तपासणी केली.
डॉ. पद्मजा गरुड यावेळी म्हणाल्या, महिलावर्गात कॅन्सरचे प्रमाण जास्त आढळते. याचेमुख्य कारण महिला स्वतःची काळजी घेत नाहीत. शरीरावर आलेली कोणतीही न दुखणारी गाठ कॅन्सरची तपासणी केल्यानंतर ओळखली जाते. त्यावर लवकर उपचार केलेअसता कॅन्सर बरा होऊ शकतो. महिलां मध्ये गर्भाशयाची पिशवी व स्तनातील गाठ अशा दोन ठिकाणी कॅन्सर होऊ शकतो.महिलांनी याबाबत जागरूक रहाणेमहत्त्वाचे आहे. केमोथेरपीच्या साहाय्याने कॅन्सरवर उपचार केला जातो, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक डॉ. भारत देवकर यांनी केले. रवींद्र कडलग यांनी मनोगत व्यक्‍त केले. सचिन भंडारी यांनी सूत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)