वेळेअगोदर आल्याचा फायदा संघाला मिळेल – स्टीफन कॉन्स्टेनटाईन

आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा

दुबई: येत्या पाच जानेवारी पासून सुरू होणाऱ्या एएफसी आशियाई कप स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी भारतीय फुटबॉल संघ संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे पोहोचला आहे. युएई मध्ये स्पर्धेसाठी दाखल होणारा भारतीय संघ हा वेळेच्या खूपच पुर्वी हजर झाला आहे. वेळेअगोदर आल्याने संघाला त्याचा फायदा मिळेल असे भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना 6 जानेवारीला थायलंडविरुद्ध खेळणार आहे. येथे लवकर दाखल झाल्याने येथील वातावरण व परिस्थितीशी जुळवून घेण्यास आम्हाला मदत मिळणार आहे, असेही कॉन्स्टेनटाईन म्हणाले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. भारताच्या गटात थायलंडशिवाय यूएई व बहरीनसारखे संघ असून, त्यांच्याकडून आव्हान मिळण्याची शक्‍यता आहे.

इतक्‍या मोठ्या स्पर्धेपूर्वी संघाच्या दृष्टीने खाण्यासोबत इथली संस्कृती जाणने महत्त्वाचे आहे. आम्हाला लवकर आल्याचा नक्कीच फायदा होईल व संघाच्या चुका सुधारण्यास देखील आम्हाला वेळ मिळेल. विशेष म्हणजे खेळाडूंसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी आम्हाला मिळणार आहे, असे कॉन्स्टेनटाईन म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)