वेळू-भोंगवलीत ग्रामसदस्यांसाठी कार्यशाळा

पानशेत – वेळू-भोंगवली गटातील सर्व ग्रामपंचयत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामसेवक यांची प्रशिक्षण कार्यशाळा रविवारी (दि. 25) ठेवण्यात आली होती. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील आदर्श गाव पाटोदा येथील सरपंच आणि महाराष्ट्र पंचायत राज कमिटीचे सदस्य भास्करराव पेरे पाटील, तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील, यशदाचे वराळे, माजी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी सरपंच आणि सर्व मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

भोर तालुक्‍यातील टंभर टक्के कर वसुली झालेल्या 16 ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींचा सत्कार केला. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने पंचायत समिती सदस्य रोहन बाठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वेळु-भोंगवली गट तालुक्‍यातच नव्हे तर जिल्ह्यातील आदर्श गट होण्यासाठी यासंबंधी संपूर्ण गटाचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करून यावर सर्वांनी राजकीय गट तट विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)