वेळाच्या काठ्या चोरल्यामुळे शेतकऱ्याला मारहाण

प्रातिनिधिक फोटो

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील वडगाव काशिंबेग येथील द्राक्ष बागेतील झाडांना आधार देण्यासाठी लावलेल्या वेळाच्या काठ्या कोणीतरी काढुन नेल्याच्या कारणावरुन चिडुन जावून निघोटवाडी येथील एका शेतकऱ्याला चार जणांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात मंचर पोलीस ठाण्यात संबंधित चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अशोक बापुराव निघोट यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संजय वामनराव बाणखेले, शुभांगी संजय बाणखेले, लिलाबाई वामनराव बाणखेले, त्रिंबक लिंबाजी गभाले (सर्व रा. बाणखेलेमळा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाणखेले कुटुंबीयांनी वडगाव काशिंबेग येथील खंडाने घेतलेल्या शेतजमिनीतील द्राक्षांच्या झाडांना आधार देण्यासाठी असलेल्या वेळाच्या काठ्‌या कोणीतरी काढुन नुकसान केले आहे. या कारणावरुन चिडुन जावुन निघोटवाडी येथील राहणारे अशोक बापुराव निघोट यांच्या घरात संजय बाणखेले, शुभांगी बाणखेले, लिलाबाई बाणखेले, त्रिंबक गभाले यांनी प्रवेश करुन दुधाच्या किटलीने निघोट यांना मारहाण केली. तसेच घरातील लोकांना शिवीगाळ करुन पुन्हा आमचे नादाला लागला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ए. बी. मडके करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)