वेळप्रसंगी स्वतः खर्च करून कालवे करू- डॉ. सुजय विखे

 कालव्यांचे काम सुरू करण्यासाठी तहसीलसमोर दिला ठिय्या

राहाता: निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करुन साईबाबा संस्थानकडून पाचशे कोटींचा निधी संस्थान व राज्य सरकारच्या माध्यमातून मिळविला. यातून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम टेलपर्यंत निश्‍चित होईल. तुम्ही फक्त कालव्यात पाणी सोडा, शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहचवायचे ते ना. विखे पाहतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वेळप्रसंगी स्वतःच्या खर्चातून ही कामे करू, असे प्रतिपादन युवा नेते डॉ.सुजय विखे यांनी केले.
अकोले तालुक्‍यातील निळवंडे कालव्यांचे बंद पडलेली कामे पूर्ववत सुरू करण्यासाठी तालुक्‍यातील सर्व लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने डॉ.सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली राहाता तहसील कार्यालयासमोर आज (दि.26) ठिय्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. विखे बोलत होते. अकोले तालुक्‍यात कालव्यांसाठी भूसंपादन झाले, त्यावेळी शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या. आज तेच शेतकरी निवेदने देऊन काम बंद पाडत आहेत. बंदिस्त कालवे आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे. राज्यात एकाही धरणाचे कालवे बंदिस्त नाहीत.

लोकसभेत खासदारांनी विचारलेल्या प्रश्‍नास उत्तेर देतांना नितीन गडकरी यांनी बंदिस्त कालवे होऊ शकत नाहीत, असे स्पष्ट केले. मग वारंवार तेच प्रश्‍न उकरुन काढत राजकारण करणे योग्य नाही. अकोले तालुक्‍यात निळवंडे धरणाचे उच्चस्तरीय कालवे झाले, त्या ठिकाणचे शेतकरी आनंदी आहेत. संगमनेर शहराने निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आणली. संगमनेत शहर सुखी आहे. मग फक्त राहाता तालुका वंचित राहिला. आमचा तालुका वंचित होणार असेत, तर आम्हाला भांडावेच लागेल.

निळवंडे कालव्याचे काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत मतदान मागण्यासाठी येणार नाही, असे विखे यांनी स्पष्ट केले होते. 2300 कोटींपैकी एक हजार कोटींची कामे झालीत. 1300 कोटींची कामे बाकी आहेत. मात्र खासदार सदाशिव लोखंडे यांनी दोन हजार कोटी कशासाठी आणले. नितीन गडकरींच्या प्रत्येक भाषणात दोन हजार कोटींच्या खाली आकडे नसतात केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक राज्यात हजार पंधराशे कोटींचे प्रकल्प होत असतील, तर मग प्रत्येक राज्यात त्यांची सत्ता का जाते. माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निळवंडे धरणासाठी मोठे योगदान आहे. बाळासाहेब थोरात काय करतात, हे त्यांनाच माहिती.

मात्र प्रत्येक वेळी विखे कुटुंबियांवर आरोप केले जातात, हे योग्य नाही. संगमनेर तालुक्‍याल काही गावांमध्ये आजही कालव्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन झालेले नाही. मग निधी कोण आणतो आणि काम कोण बंद पाडते, जनतेच्या लक्षात आले पाहिजे. येत्या पंधरा दिवसांच्या आत बंद पडलेली कालव्यांची कामे सुरु न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असे इशारा त्यांनी दिला. प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे व तहसीलदार माणिकराव आहेर यांना निवेदन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)