वेल्ह्यातील अधिकाऱ्यांचा कादवे ग्रामस्थांनकडून गौरव

वेल्हे- वेल्हे तालुक्‍यातील उत्कृष्ट काम केलेल्या शासकीय अधिकाऱ्यांचा कादवे येथील ग्रामस्थाकडून नुकताच पुष्पगुच्छ देऊन गौरव केला असल्याची माहिती माजी सरपंच नंदा ठाकर यांनी दिली.
नंदा ठाकर म्हणाल्या की, वेल्हे तालुक्‍यात तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस ठाणे या मुख्य प्रशासकीय ठिकाणी चांगले अधिकारी आले असून तालुक्‍यातील या अधिकाऱ्यांनी गतिमान काम केले आहे. वेल्हे तालुक्‍याचे तहसीलदार प्रदीप उबाळे यांना जिल्ह्यातील आदर्श तहसीलदार म्हणुन शासनाने नुकतेच गौरविले आहे. तसेच पंचायत समितीमधील प्रशासन देखील गतिमान झाले असून येथील कामचुकार व सतत गैरहजर कर्मचाऱ्यांना गटविकास अधिकारी मनोज जाधव यांनी चांगलेच वटणीवर आणले आहे. तसेच तर तालुक्‍यातील गुन्हेगारीला आळा बसला असून पर्यटनासाठी आलेले मद्यधुंद पर्यटकांवर वेल्हे पोलीसांकडून धडक कारवाई सुरु असल्याने मद्यधुंद पर्यटकांना देखील चपराक बसली आहे. तर अवैध धंदे देखील बंद झाले आहेत. अशा कर्तव्यदक्ष अधिकारी वर्गास गौरविण्याचे कादवे येथील ग्रामस्थांनी ठरविले होते त्यानुसार सर्व प्रथम तहसीलदार प्रदीप उबाळे नंतर गटविकास अधिकारी मनोज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांचा शाल नारळ, पुष्प गुच्छ ठेवुन गौरविण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकर डॉ. रमेश देशपांडे, चेतन जागडे, दादा जागडे, धोंडींबा जागडे, संजय सुर्वे, पांडुरंग जागडे, दिनकर ठाकर, पांडुरंग काटकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)