वेल्हे येथे राज्यस्तरीय कुस्तीचे आयोजन.

पानशेत- श्री स्वयंभू मेंगाई देवीच्या 371 व्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र कुस्तीगीर संघ व वेल्हे येथील देवस्थान ट्रस्ट, वेल्हे तालुका कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅटवरील मल्लसम्राट महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघाचे सरचिटणीस प्रदीप भोसले, वेल्हेच्या सरपंच कल्पना भेगडे, माऊली मांगडे आणि राजाभाऊ रायरीकर यांनी दिली.
ही स्पर्धा दि. 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान भोर तालुक्‍यातील वेल्हे येथे तोरणा गडाच्या पायथ्याशी होणार आहे.
स्पर्धेत 57, 61, 65, 70, 74, 86 आणि 84 ते 120 खुला गट सहभागी होणार आहे.
लहान गटात 25, 30, 36, 42 आणि 50 किलो वजनी गट असतील. याशिवाय महिलांसाठी आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय कुस्त्या घेण्यात येणार आहेत. खुल्या गटातील विजेत्याला थार जीप गाडी देण्यात येणार आहे तर उपविजेत्याला बुलेट देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)