वेल्हे येथे पेंढा जाळला

वेल्हे- अहिल्यानगर (ता. वेल्हे) येथील रघुनाथ ढेबे या शेतकऱ्याचा अज्ञात व्यक्तीने भाताचा पेंढा जाळण्यात आला, त्याच्या घराजवळच लागून भाताच्या पेंढ्याची गंज रचून ठेवली होती. पावसाळ्यात जनावारांना खाण्यासाठी चारा म्हणून पेंढ्याचा उपयोग व्हावा, याकरिता राखून ठेवला होता. रात्री एकच्या वेळी अज्ञात व्यक्तीने ती गंज पेटवून दिली.
पेंढा वाळलेला असल्यामुळे पेट घेतला. आगीने उग्र रुप धारण केले, ज्वाला आकाशाला भिडत होत्या. रघुनाथ ढेबे व त्यांचे कुटूंब घरातील पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. पण, प्रयत्न व्यर्थ ठरत होते. आग्निशामक दल नसल्यामुळे आग वाढली, त्यात अखेर पेंढा जळून खाक झाला. यात शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले. आदिवासी धनगर कुटूंब असल्यामुळे परिस्थिती खूप बेताची आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने जनावरांना चारा मिळेनासा झाला आहे. दुष्काळाच्या चटका सहन करीत भातशेती करुन भाताचा पेंढा रचला. पण, आगीत तो खाक झाला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)