मंचर- आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील एका वेल्डिंग व्यवसायिकाच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड आणि इतर साहित्य असे अंदाजे दहा ते बारा हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. तसेच इतर दोन ठिकाणीही चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. चोरीची घटना शुक्रवारी (दि. 23) पहाटे घडली.
या प्रकरणी दुकानचे मालक निखील वसंत चिखले यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे वेल्डिंग दुकानातील सहा हजार रुपये किमतीचे दोन डिल मशीन व तीन हजार रुपये, चार कोरी बिलबुक व होमथिएटरचे मेमरी कार्ड असा एकूण अंदाजे दहा ते बारा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच चोरट्यांनी शेजारील गुरुकृपा ऍटो गॅरेज आणि खत औषधाचे दुकानाचे शटर उचकटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0