वेब सीरीजमध्ये झळकणार मिलिंद सोमन

भारतातील सुपर मॉडल आणि अभिनेता मिलिंद सोमन लवकरच प्राइम ओरिजिनल “फोर मोर शॉट्‌स प्लीज’ या वेब सीरीजमधून पदार्पण करणार आहे. लग्नानंतर मिलिंदचा हा पहिलाच प्रोजक्‍ट असून त्याचे प्रशंसक पुन्हा एकदा त्याचा दमदार अभिनय पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

“फोर मोर शॉट्‌स प्लीज’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून दर्शकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात शहरातील धावता जीवनातील भावनात्मक प्रवास दाखविण्यात आला आहे. यात मिलिंद हा एका डॉक्‍टरची भूमिका साकारत आहे. मिलिंदला पहिल्यांदाच अशा भूमिकेत पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ही नवीन प्राइम ओरिजिनल सीरीज महिलांमधील मैत्रीणूपर्ण संबंधावर प्रकाश टाकणारी आहे. जी शहरी भारतातील तरुणींमध्ये जीवनरेखाप्रमाणे काम करत आहे. जेव्ही ती निरंतर भूमिका बदल असलेल्या सामाजिक संस्कृतीशी झगडत असते. यातील अधिकांश कलाकार या महिला आहेत. या सीरीजची लेखिका देविका भगत असून इशिता मोइत्रा यांनी डायलॉग लिहिले आहेत. याचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले आहे.

दरम्यान, “फोर मोर शॉट्‌स प्लीज’मध्ये सयानी गुप्ता, कीर्ति कुलहारी, बानी जे, मानवी गगरू, प्रतीक बब्बर, लिजा रे, मिलिंद सोमन आणि नील भूपालम मुख्य भूमिका साकारत आहे. ही वेब सीरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)