वेब सिरीज, पुरुष आणि सेक्‍स लाईफ

भारतीय तरुणाईमध्ये सध्या ‘वेबसेरीज’ची जबरदस्त क्रेझ आहे. सेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त असलेल्या या मनोरंजनाच्या नव्या आविष्कारणाने ‘बोल्ड’ दृश्‍य आणि ‘तिखट’ भाषेच्या जोरावर तरुणाईला चांगलीच भुरळ घातली आहे. ‘मसाला’ या मुख्य इन्ग्रेडियंट व्यतिरिक्त 21व्या शतकातील आधुनिक समाजाच्या बदललेल्या आवडी-निवडी आणि या पिढीचे प्रश्‍न यांचे योग्य आकलन हा देखील वेब सिरीजच्या यशामागचा एक महत्वाचा पैलू असल्याचे मान्य करावे लागेल.

वेब सिरीजच्या माध्यमातून सध्या अशाच एका महत्वाच्या प्रश्‍नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं दिसत आहे. तसं पाहायला गेलं तर मूळ प्रवाहातील भारतीय माध्यमांमधून आतापर्यंत ‘सेक्‍स लाईफ’ बाबत फारसे प्रयोग झालेले दिसत नाहीत. पाश्‍चिमात्य माध्यमांप्रमाणे लैंगिक आयुष्याबाबत खुलेपणाने विचार मांडण्याची खुमखुमी येथील निर्मात्यांनी दाखवली नाही हे सत्य नाकारता येण्यासारखे नाही. मात्र अवघ्या वर्षभरापूर्वीच भारतामध्ये नावारूपास आलेल्या वेब सिरीजने मात्र भारतीय माध्यमांनी स्वतःभोवती आखून घेतलेली ही लक्ष्मण रेषा यशस्वीपणे ओलांडल्याचे दिसते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या वर्षी रिलीज झालेली ‘लस्ट स्टोरीज’ असो वा नुकतीच रिलीज झालेली ‘अपहरण’ असो अशा जवळपास सर्वच वेब सिरीजच्या कथानकांना पुरुषांच्या लैंगिक समस्यांचा प्रश्‍न स्पर्श करून गेलेला दिसतो. वेब सिरीजमध्ये पुरुषांच्या लैंगिक समस्यांबाबत व्यक्त होण्याबाबतची स्पष्टता भारतीय प्रेक्षकांसाठी नवीन असली तरी प्रेक्षकांनी या प्रयोगाला उदंड प्रतिसाद दिला आहे. लैंगिक समस्या हे समाजातील एक वास्तव आहे. मात्र प्रतिमेचे बळी ठरलेले पुरुष आपल्यातील लैंगिक गुणदोषांबाबत खुलेपणाने समोर येताना दिसत नाहीत. अशावेळेस जर माध्यमांमधून जागृती झाली तर ही घुसमट नक्कीच थांबू शकते आणि त्या बाजूने वेब सेरीजच्या माध्यमातून टाकलेले हे पाऊल नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. असे असले तरी सर्वच निर्मात्यांकडून सादर करण्यात आलेले प्रयोग स्तुत्यच आहेत असे नाही. वेब सिरीजच्या माध्यमातून सादर करण्यात आलेले काही प्रयोग केवळ अश्‍लीलतेला आणि सेक्‍शुयल फॅन्टसीला वाट मोकळी करून देत असल्याचे जाणवते. अशा प्रकारे सेक्‍स लाईफ बाबत व्यक्त होत असताना विषयाला अश्‍लीलतेची किनार स्पर्शून जाणार नाही याची काळजी देखील निर्मात्यांकडून घेतली जाणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. हायली ‘कमर्शियल’ असलेल्या या वेबसिरीजच्या दुनियेमध्ये लैंगिक समस्यांचा उलगडा करण्याच्या नावाखाली ‘गंदी बात’ पसरवण्याचा गोरखधंदा चालविण्याचे प्रकार देखील घडू शकतात, ही शक्‍यता देखील नाकारता येणार नाही.

– प्रशांत शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)