वेबसाईटवरुन कारविक्रीच्या बहाण्याने फसवणूक

पुणे – ओएलएक्‍सवर कार विक्रीची जाहीरात टाकून एकाची 1 लाख 69 हजार 200 रुपयांची फसवणूक करण्यात आली. कारखरेदीसाठी ऑन लाईन पैसे घेऊन कारचा ताबा देण्यात आला नाही. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी झेबा खान(24,रा.येरवडा) यांनी ओएलएक्‍स वेबसाईटवर साडेतीन लाखाची कार विक्री करायला असल्याची जाहीरात वाचली होती. त्यानुसार त्यांनी मोबाईलवर विक्रेत्याशी वारंवार संपर्क साधला होता. गाडीचे फोटो पाहून त्यांनी गाडी पसंत केली होती. आरोपीच्या सांगण्यानूसार त्यांनी बॅंक खात्यावर प्रथम 40 हजार 200 रुपये आणि नंतर 1 लाख 20 हजार रुपये ट्रांन्सफर केले. मात्र त्यानंतर आरोपीने फोन बंद केला. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक(गुन्हे)कदम तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)