वेध “सिंहगड’ मनाचा…

सिंहगड इन्स्टिट्यूट्‌सचा रौप्यमहोत्सव…

शैक्षणिकदृष्ट्या प्रगत अशा महाराष्ट्राला शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या संस्थांची दीर्घ परंपरा आहे. हेच कार्य पुढे चालविण्यासाठी सिंहगड शिक्षण समूह अर्थात सिंहगड टेक्‍निकल एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून प्रा. एम. एन. नवले सरांनी ज्ञानदानाच्या पवित्र कार्याची 12 ऑगस्ट 1993 रोजी मुहूर्तमेढ रोवली. त्याला आज बरोबर 25 वर्षे पूर्ण होत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही रौप्यमहोत्सवी वाटचाल लक्षणीय अशीच आहे. दर्जेदार शिक्षणातून सामाजिक परिवर्तन हे उद्दीष्ट ठेवून “सिंहगड’ आपल्या 12 शिक्षण संकुलांद्वारे एका लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक पासून आरोग्य उच्चतंत्र शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे. गेल्या 25 वर्षात 12 कॅंपसमध्ये 85 महाविद्यालये व 15 शाळा यांचे जणू जाळेच विणले आहे. सिंहगड संस्थेत सर्व विद्याशाखांचे दर्जेदार शिक्षण उपलब्ध आहे.

संस्थापक प्रा. नवले हे अतिशय द्रष्टे व कुशाग्र बुद्धीचे शिक्षणतज्ञ आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थांचा वृक्ष उत्तरोत्तर बहरत गेला व त्यामुळे आज हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली आहे. तसेच हजारो विद्यार्थी आपल्या यशस्वी व्यवसायीक जीवनाची वाटचाल करीत आहेत. सिंहगड संस्थेमुळे किमान 8000 लोकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे.

अप्रत्यक्ष रोजगार 5000 पेक्षा जास्त लोकांना मिळाला आहे. आज भारताने जगभर आपल्या ज्ञानसंपदेचा ठसा उमटविला आहे, त्याचे मुख्य कारण “सिंहगड’सारख्या संस्थांमधून दिले जाणारे दर्जेदार शिक्षण. बदलत्या काळात सामाजिक गरजा हेरून “सिंहगड’ ने अनेक सामाजिक उपक्रम राबवून त्यातून समाजाप्रती असलेली संवेदनशिलता व समाजप्रती कृतज्ञता व्य्क्‍त केली आहे. संस्थेच्या वैद्यकीय व दंत महाविद्यालय/रुग्णालयामुळे हजारो गरजू रुग्णांना माफक दरात आरोग्य सेवा उपलब्ध होत आहे.

आज “सिंहगड इन्स्टिट्यूटस’ आरोग्य व उच्च तंत्र शिक्षण क्षेत्रातील राज्यातीलच नव्हे; देशातील एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. त्यात संस्थेची शिक्षणा विषयी निष्ठा तळमळ व अथक परिश्रम तसेच निर्णय क्षमता व संघ वृत्ती दिसून येते. “सिंहगड संस्थेने’ मूल्यात्मकतेचे नवीन परिमाण व आदर्श घालून दिले आहेत. जात धर्म राजाश्रय यात कोठेही बंदिस्त न होता “तांत्रिकता-आधुनिकता-मानवता’ हया त्रिसुत्रीवर आधारित एक “शाश्‍वत’ शैक्षणिक विश्‍व अभियांत्रीकी समाजाभिमूख कल्पनेतून निर्माण केले आहे. गेल्या 25 वर्षात 7000 पेक्षा जास्त प्राध्यापकांचे व 2000 पेक्षा जास्त विदयार्थ्यांचे शोधनिबंध प्रकाशित करण्यात आलेत. याच काळात 150 पेक्षा जास्त पेटेंटस फाईल करण्यात आलेत. आज हया देशाच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी पर्यावरणपूरक व सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीची गरज लक्षात घेवून सिंहगड संस्थेची स्थापना निःस्पृह दृष्टीने करण्यात आली. या संस्थेस रौप्यमहोत्सवानिमित्त “आभाळभर’ शुभेच्छा.

(शब्दांकन प्राचार्य डॉ. के. एन.गुजर)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)