वेद वासुदेव प्रतिष्ठानतर्फे श्री गुरुप्रतिपदा सोहळा

पिंपरी- वेद वासुदेव प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गुरुप्रतिपदा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बुधवार (दि.20) रोजी श्री गुरुप्रतिपदा असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे आयोजन वेद वासुदेव प्रतिष्ठानतर्फे चिंचवड, लिंक रोड येथील संत गार्डनमध्ये करण्यात आले आहे. सोहळ्याची सुरुवात वेद वासुदेव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प.पू. अजितदादा तुकदेव यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी उपासनेने करण्यात आले. बुधवारी सकाळी आठ वाजता प.पू. श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या पादुकांवर रुद्राभिषेक, सकाळी साडे दहा वाजता श्री गुरुपूजन होणार असून दुपारी साडे बारा ते साडे तीन दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान वेद वासुदेव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प.पू. अजितदादा तुकदेव भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत. या धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या वतीने द्वारकानाथ खर्डे आणि स्मिता ब्रह्मे यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)