वेदार्थ ऍनिमेशन ऍण्ड साऊंडस्‌ स्टुडिओचे उद्‌घाटन

पुणे: वेदार्थ ऍनिमेशन अँड साऊंडस्‌ या रेकॉर्डिंग स्टुडिओचे बिबवेवाडी, पुणे येथे दिमाखात उद्‌घाटन झाले.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चौरंगचे संस्थापक अशोक हांडे ह्यांनी फित कापून स्टुडिओचे उद्‌घाटन केले. सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री पौर्णिमा मनोहर यांची उपस्थिती लाभली. प्रायोगिक नाटककार दिलीप जगताप यांची उपस्थिती होती. या वेळी वेदार्थ ऍनिमेशन अँड साऊंडस्‌चे संचालक अभिजित शेट्ये व गंधाली शेट्ये तसेच या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संगीतकार मिलिंद जोशी, गायिका मनीषा जोशी, प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट मयूर व्यास, प्रसिद्ध साऊंड इंजिनिअर नितीन कायरकर तसेच वेदार्थ ऍनिमेशनची पूर्ण टीम उपस्थित होती. या स्टुडिओमध्ये प्रोफेशनल व्हाईस ओव्हर, डबिंज, म्युझिक आणि ऑडीओ पोस्ट प्रॉडक्‍शन अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील लोकांना याचा फायदा होणार आहे. मिलिंद जोशी व मनीषा जोशी यांच्या कविता गायनाच्या कार्यक्रमाने समारंभाची सांगता झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)