वेदांत, पद्मनाभला सुवर्णपदक

पुणे: वेदांत काकडे आणि पद्मनाभ अदमानेने सुरेख कामगिरी करताना येथे सुरू असलेल्या पुणे महपौर चषक मल्लखांब स्पर्धेतील आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावले.

यावेळी झालेल्या 10 वर्षांखालील गटांमधील सामन्यात वेदांत काकडेने 5.60 गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. तर, वेदांत वाडेकरने 5.53 गुणांसह रौप्य आणि सार्थक पवारने 5.40 गुण मिळवत कांस्यपदक पटकावले. तर, 12 वर्षांखालील गटात पद्मनाभ अदमानेने 8.06 गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. तर, मंथन संचेतीने 7.80 गुणांसह रौप्य आणि संस्कर शिंदेने 7.70 गुणांसह कांस्पपदकाची कमाई केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर, 14 वर्षांखालील गटाममधील सामन्यांमध्ये अद्वैत पेंडसेने 8.06 गुण मिळवत सुवर्णपदक मिळवले. तर, निल गवांदेने 7.57 गुणांसह रौप्य आणि प्रथमेश जाधवने 7.50 गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. तर, 18 वर्षांखालील मुलांच्या गटात शुभंकर खवलेने सुवर्णपदक पटकावले. तर, वेदांत अंबेकरने रौप्य आणि अमेय सुर्यवंशीने कांस्यपदकाची कमाई केली. तर, मुलींच्या सामन्यांमध्ये 10 वर्षांखालील गटात शमिका उभेने 7.73 गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. तर, सानिका गोंदानेने 7.36 गुणांसह रौप्य आणि यशदा निकमने 7.30 गुणांसह कांस्यपदक पतकावले. तसेच 12 वर्षांखालील गटात तृप्ती खराडेने 7.93 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. तर, नंदिनी वस्त्राडने 7.40 गुणांसह रौप्यपदकावर आपले नाव कोरले. तर, अनुश्री जोशी आणि शर्वरी मोरे या दोघींनीही 7.13 गुण मिळवल्याने त्यांना रौप्यपदक विभागुन दिले.
तर, 14 वर्षांखालील मुलींच्या गटात आर्या अभ्यंकरने 8.53 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. तर, रेवा कुलकर्णीने 8.33 गुणांसह रौप्य आणि यशश्री रायकरने
कांस्यपदक पटकावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)