वेदांतिकाराजे यांना लायन्स गौरव पुरस्कार प्रदान

सातारा : सौ. वेदांतिकाराजे भोसले यांना पुरस्कार प्रदान करताना श्रीनिवास पाटील.

सातारा, दि. 18 (प्रतिनिधी) – लायन्स क्‍लबचे जगभरात जाळे पसरले असून या क्‍लबमार्फत मोठे समाजकार्य घडत आहे. या संघटनेने लायन्स गौरव पुरस्कारासाठी महिलांचे सक्षमीकरण करणाऱ्या सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्यासारखी व्यक्‍ती निवडून सातारकरांचा तसेच लायन्स क्‍लबचाही गौरव वाढवला आहे. सौ. वेदांतिकाराजे या महिला सक्षमीकरण चळवळीतील दिपस्तंभ असून त्यांना माझ्या हस्ते पुरस्कार देताना अभिमान वाटत आहे, असे उद्‌गार सिक्‍कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढले.

वाढेफाटा येथे लायन्स क्‍लबच्या कार्यक्रमात सौ. वेदांतिकाजे भोसले यांना श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते लायन्स गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉन्फरन्सचे चेअरमन राजेंद्र मोहिते होते. लायन्स क्‍लबचे रिजन चेअरमन बाळकृष्ण जाधव, वासुदेव कलघटगी, जितेंद्र जोशी, रवींद्र देशपांडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समाजातील वंचित आणि गरजू घटकांना लायन्स क्‍लबमुळे जगण्याची नवी दृष्टी मिळाली आहे, असंख्य जीवांचे जगणे सुसह्य झाले आहे. त्याच लायन्स क्‍बलने सौ. वेदांतिकाराजे यांच्या सारख्या महान लोकसेविकेच्या समाजकार्याची दखल घेवून मानाचा लायन्स गौरव पुरस्कार दिला. या पुरस्कारासाठी सौ. वेदांतिकाराजे यांची निवड करुन लायन्स क्‍लबने खऱ्या अर्थाने पुरस्कार देण्या मागचा हेतु सार्थ ठरवला असल्याचे श्रीनिवास पाटील म्हणाले.

बाळकृष्ण जाधव यांनी लायन्स क्‍लबचे कार्य आणि लायन्स गौरव पुरस्काराबाबत माहिती दिली. रिजनल सेक्रेटरी शिवाजीराव शिंदे, झोनल चेअरमन रविंद्र बेलगलकर, सुहास निकम, सचिन काळे यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण विभाग, बारामती या ठिकाणचे सर्व प्रांतीय अधिकारी आणि सर्व क्‍लबचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)