वेदांतकडून खाण क्षेत्रात गुंतवणूक

नवी दिल्ली: धातू आणि खाण क्षेत्रातील जागतिक पातळीवरील प्रमुख कंपनी वेदान्त पुढील तीन वर्षांत भारतामध्ये 560 अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार आहे. देशातील विविध प्रकल्प, व्यवसायांत ही गुंतवणूक असणार आहे.
देशांतर्गत तेल उत्पादनात कंपनीचा हिस्सा 27 टक्‍के असून तो 50 टक्‍क्‍यांपर्यंत नेण्यासाठी 3 ते 4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येईल असे कंपनीचे प्रमुख नवीन अगरवाल यांनी म्हटले. चालू वर्षात कंपनीने ऍल्युमिनियम, चांदी, जस्त आणि झिंकचे विक्रमी उत्पादन केले आहे. या व्यवसायांतही एकूण 3 ते 4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)