वेतन ठरविताना महिलांवर अन्याय

नवी दिल्ली -भारतात अजूनही महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन मिळत आहे. भारतात महिलांना पुरुष सहकाऱ याच्या तुलनेत सरासरी 16.1 टक्के कमी वेतन देण्यात येते. वेतनामध्ये अजूनही भेदभाव होणे ही गंभीर बाब आहे. मात्र महिलांमध्ये कौशल्याचा अधिक प्रमाणात वापर करण्यात आल्यास हे प्रमाण घटण्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर साधारण हेच प्रमाण आहे असे कॉर्न फेरी अहवालात म्हणण्यात आले.

कॉर्न फेरी जेन्डर पे इन्डेक्‍समध्ये सर्वे करण्यासाठी जगभरातील 53 देशांतील 14,284 कंपन्यांतील 1.23 कोटी कर्मचाऱ्यांना सहभागी करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरही महिल्यांना पुरुषांच्या तुलनेत सरासरी 16.1 टक्के कमी वेतन आहे. मात्र निवडक क्षेत्रातील काही कंपन्या, काही रोजगार पातळीमध्ये ही असमानता घटत आहे.

-Ads-

आंतरराष्ट्रीय पातळीवर काही कंपन्यांचा विचार करता ही वेतन असमानता 1.5 टक्‍क्‍यांपर्यंत कमी आहे. एकाच कंपनीमध्ये समान पातळीवर काम करताना काही कंपन्यामध्ये महिला आणि पुरुषांच्या वेतनामध्ये 0.5 टक्‍क्‍यांचा फरक आहे. मात्र भारतात अलग अलग कंपन्यांमध्ये एकाच नोकरी करताना हे अंतर 4 टक्के आहे. कंपनी आणि एकाच स्तरातील नोकरीमध्ये मिळणाऱ्या वेतनातील अंतर 0.4 टक्के आहे. एकाच कंपनीमध्ये एकाचे पातळीवर काम करणाऱ्या पुरुष आणि महिलेच्या वेतनामध्ये 0.2 टक्‍क्‍यांचे अंतर आहे.

भारतापेक्षा चीनमध्ये वेतनाबाबत भेदभाव करण्याचे प्रमाण कमी आहे. चीनमध्ये हे प्रमाण 12.1 टक्के असून ब्राझीलमध्ये 26.2 टक्के, फ्रान्समध्ये 14.1 टक्के, जर्मनीमध्ये 16.8 टक्के, ब्रिटन 23.8 टक्के आणि अमेरिकेत 17.6 टक्के आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)