वेण्णालेकमध्ये बुडून एकाचा मृत्यू

महाबळेश्‍वर – वेण्णालेक येथे हात पाय धुण्यासाठी गेलेल्या ताजुद्दिन उस्मान मानकर (वय 58, रा. रांजणवाडी) पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. हॉटेल कॅन्व्हसिंग करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे ताजुद्दीन उस्मान मानकर हे शनिवारी सकाळी साडे सहा वाजता नेहमी प्रमाणे घरातून बाहेर पडले.

सकाळी साडे आठ वाजता ते वेण्णालेक जवळ हात पाय धुण्यासाठी एकटेच गेले होते. त्यांना जाताना काही लोकांनी पाहिले होते. वन विभागाच्या वाहन तळापासून पायऱ्या उतरून ते पाण्याजवळ गेले. तेथे एका पायरीवर आपला चष्मा काढुन ते पाण्यात हातपाय धुवत असताना पाय घसरल्याने ते पाण्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले व त्यातच त्यांचा मृत्यु झाला. याबाबत त्यांचे बंधु अब्दुलकादर उस्मान मानकर यांनी महाबळेश्‍वर पोलिसांना

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)