वेण्णानागर-वेळेकामथी रस्त्याचे उद्या भूमिपूजन

सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) – वेण्णानागर ते वेळेकामथी रस्त्यासाठी 4 कोटी 92 लाख मंजूर झाले असून त्याचा भूमिपूजन कार्यक्रम वेण्णानागर येथे दि. 29 रोजी सायंकाळी 6 वा.आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य प्रतीक कदम राहणार आहेत.
जिल्हा परिषद व जिल्हा नियोजनाच्या समितीच्या फांडातून चोरगेवाडी ग्रामपंचायत कार्यालय इमारतीसाठी 10 लाख मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय, अंगणवाडीसमोर पेवर्स ब्लॉक बसवण्यासाठी 2 लाख मंजूर करण्यात आले आहे. आगुंडेवाडी येथील स्मशानभूमी शेड बांधण्यासाठी 4 लाख मंजूर झाले असून घाटाईचा माळ येथे वळण बंधारा बांधण्यासाठी 10.44 लाख एवढे मंजूर करण्यात आले आहे. आहिरेवाडी येथेही संरक्षक भिंतीसाठी 3 लाख मंजूर करण्यात आले आहेत. वेण्णानागर – साबळेवाडी येथील भूमिपूजनानंतर कण्हेर येथे सायंकाळी 6.30 वाजता आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी वेण्णानगर, वेळेकामथी परिसरातील ग्रामस्थांनी भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)