उरमोडी जलाशयात बाधित वेणेखोल ग्रामस्थांचा जलसमाधीचा इशारा

सातारा, (प्रतिनिधी) – उरमोडी जलाशयात बाधित झालेल्या गावांच्या पूनर्वसनाचा प्रश्न अद्यापही रेंगाळत पडला आहे. यातच वेणेखोल येथील 165 खातेदारांच्या पूनर्वसनाचा प्रश्न गेल्या वीस वर्षांपासून रखडला असून प्रशासनाकडून फक्त आश्वासनेच दिली जात आहेत. पूनर्वसनासह इतर विषयांवर प्रशासन सकारात्मक निर्णय घेत नसल्याने वेणेखोल ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देवून मंगळवार दि. 14 रोजी उरमोडी जलाशयात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, वेणेखोल येथील 165 खातेदारांच्या पूनर्वसनाचा प्रश्न गेल्या वीस वर्षा पासून शासन व अधिकाऱ्यांच्या चालढकल पणामुळे रखडला आहे. यासाठी गेले वीस वर्षे गल्ली ते दिल्ली असा पत्रव्यवहार, आंदोलने, आमरण उपोषणे करुनही सुटलेला नाही. त्यामुळे आता आर या पारची लढाई करण्याचा निर्धार घेण्यात आला आहे.
वेणेखोलचे पूनर्वसन म्हसवड ता.माण येथे व्हावे यासाठी वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र, जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांकडून वेळ काढूपणा केला जात आहे. दि.22 जानेवारी 2018 रोजी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींसमवेत बैठक झाली. यात आठच दिवसात पूनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन देण्यात आले होते. यासह प्रत्येक खातेदारास 3 लाख रुपये प्रति वर्षा प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी. 65 टक्के रक्कम त्वरीत खातेदाराच्या खात्यावर जमा व्हावी. उदरनिर्वाह भत्ता त्वरीत मिळावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
जिल्हा पूनर्वसन अधिकारी धरण ग्रस्थांशी दुहेरी चाल खेळत असून मलिद्यासाठी जमिनी इतर खाजगी लोकांना थेट वाटा घाटीने दिल्या जात आहेत. दरम्यान, यावर त्वरीत तोडगा न निघाल्यास उरमोडी जलाशयात जलसमाधी घेण्याचा इशारा वेणेखोल ग्रामस्थांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)