वेटलॉस मॅनेजमेंट

अचानक जाडी वाढते आणि मग या वाढलेल्या चरबीचे काय करायचे हे न समजल्याने ती कमी करण्यासाठी चुकीचे उपाय अवलंबले जातात. यामुळे जाडी कमी तर होत नाहीच, पण इतरच समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता असते. शरीरावर चरबी वाढल्याने आरोग्यावर त्याचे होणारे परिणाम… तो कमी करण्यासाठी असणाऱ्या विविध उपचारपद्धती याविषयी…

लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करताना दिसत आहे. दुर्दैवाने लठ्ठपणा आणि त्याचे वाढते स्वरूप ही एक गंभीर व्याधी आहे. मात्र, याचे पुरेसे ज्ञान समाजामध्ये नाही. त्यामुळे अत्यंत अवैज्ञानिक आणि विचित्र पद्धतीने आरोग्याशी खेळ होताना दिसतो आणि यातून कुठल्याही वयोगटातील लोकांची सुटका नाही. अनेकदा लठ्ठपणाकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले जाते. मात्र, कालांतराने विविध आजार उद्‌भवण्यास सुरुवात झाल्यावर यावर काहीतरी करायला हवे, असे म्हणून चुकीचे उपाय अवलंबिले जातात.

वैद्यकीय शास्त्राने प्राचीन काळापासून लठ्ठपणाला एक आजार म्हणून मान्यता दिलेली आहे. कुठल्याही पद्धतीची शारीरिक व्याधी किंवा आजार हे लठ्ठ माणसांमध्ये अत्यंत वेगाने गंभीर स्वरूप धारण करतात आणि उपचारांना सहज दाद मिळत नाही. त्यामुळे हा लठ्ठपणा वेळीच आणि योग्य त्या पद्धतीने कमी केलेला कधीही चांगला. त्यासाठी काही किमान गोष्टींची माहीती करून घेणे आवश्‍यक आहे.

लठ्ठपणाला वयोगटाचे बंधन नसल्याने सध्या सर्वच वयोगटात लठ्ठपणाची समस्या जाणवते. अगदी लहान वयोगटातील मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकांमध्ये लठ्ठपणाची समस्या असल्याचे सध्या दिसते. लहानपणी गुटगुटीत वाटणारे मूल थोडे मोठे झाले की बेढब दिसू लागते त्यामुळे लहान असतानाच त्याच्या वजनावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक असते.
दिवसभर बैठेकाम असणाऱ्या व्यक्तींमध्येही लठ्ठपणाची समस्या असल्याचे दिसून येते. त्यामुळे नंतर उद्‌भवणाऱ्या प्रश्‍नांपेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी.

BMI(Body Mass Index) हे लठ्ठपणा मोजण्याचे एकक आहे. यामध्ये आपले किलोमधील वजनाला स्क्वेअर मीटरमधील उंचीने भागावे. हा आकडा 28 पेक्षा जास्त असल्यास लठ्ठपणाची सुरुवात. जसा जसा इचख वाढत जातो तशा गतीने शरीरातील इतर यंत्रणांवरील बोजा वाढू लागतो आणि त्यांचे काम अनियमित होऊ लागते. इचख 30 च्यापुढे गेल्यानंतर हे बदल वेग घेऊ लागतात. सर्वसाधारणपणे भारतीय माणसांमध्ये 32 बीएमआय च्यापुढे विविध आजार सुरू झालेले आढळतात.

डायबेटीस साखरेवरील नियंत्रण कमी होणे आणि इन्सुलिनच्या कामात अडथळे निर्माण होणे. उच्च रक्तदाब (हृदयावर अतिरिक्त वजनाचा ताण पडून रक्तदाब वाढतो त्यामुळे लिव्हर (लिव्हरचे काम बिघडायला सुरुवात होते.) खराब होण्याचा धोका असतो. कोलेस्टेरॉलची पातळी बिघडून रक्तवाहिन्यांमध्ये कठीणपणा निर्माण होतो आणि गुठळ्या निर्माण होतात. या गुठळ्या घातक ठरू शकतात.

थायरॉईड
स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये लैंगिक हार्मोन्सची निर्मिती आणि बीजनिर्मिती यामध्ये लठ्ठपणामुळे अडथळा निर्माण होतो. त्यामुळे थायरॉईड असणाऱ्यांना गर्भधारणा न होण्याची शक्‍यता जास्त असते.
लठ्ठपणाचा म्हणजेच चरबीचा शरीराच्या सर्व गोष्टींवर भार येतो. हा भार हाडांवर आल्याने सांध्याची अकाली झीज होते. त्यामुळे अनेक लठ्ठ लोकांना दैनंदिन काम करण्यातही अडचणी निर्माण होतात.

हृदयविकार
लठ्ठ लोकांना मेद साचल्याने रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे लठ्ठपणा वेळीच कमी न केल्यास या गाठींमुळे हृदयविकाराचे झटके येण्याची शक्‍यता असते.

किडनी विकार
या सर्व गोष्टींमुळे आयुष्यमान कमी होते आणि सामाजिक व आर्थिक स्तरांवर अपरिमित नुकसान होते. कुटुंबातील एक व्यक्तीच्या अतिलठ्ठपणामुळे होणारे आर्थिक नुकसान हे संपूर्ण उत्पन्नाच्या 30 ते 60 टक्केपर्यंत होऊ शकते आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे भविष्य बदलू शकते. त्यामुळे या समस्येकडे आपण गांभीर्याने पाहात नसलो तरीही त्याचा धोका जास्त असल्याचे वेळीच लक्षात घ्यायला हवे.

लठ्ठ लोकांना अनेकदा सामाजिक स्तरावरही वाईट वागणूक मिळते. भारतात आज 8 कोटींपेक्षा जास्त लोक अतिलठ्ठपणामुळे त्रस्त आहेत आणि 25 कोटींपेक्षा जास्त लोकांना आत्यंतिक तातडीच्या उपचारांची गरज आहे.

लठ्ठपणावरील उपचार पद्धती, आहार पद्धती
भूक लागल्याशिवाय खाऊ नये हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे. काही सेलिब्रेटी आहारतज्ज्ञांच्या क्‍लिप्स सोशलमीडिया इत्यादीवर व्हायरल झालेल्या दिसतात. आपला लठ्ठपणा आणि त्यामागे (दिसणारे आणि न दिसणारे) बिघडलेले आरोग्य यांचा कुठलाही विचार न करता अनेक जण अंधानुकरण करताना आढळतात. अन्नाचे सेवन करताना त्याचा वापर करताना तारतम्य बाळगायला हवे हे भान आपल्या समाजात दिसत नाही.

वजन, वय, शारीरिक क्षमता हार्मोन्स, जीवनसत्वाची पातळी, लिव्हर, किडनी थायरॉईड यांच्या क्षमता आणि विविध आजार यांचा विचार करून योग्य आहाराची आखणी केल्यास लठ्ठपणा काही प्रमाणात आटोक्‍यात येऊ शकतो. दुर्दैवाने आपण विचार न करता वाटेल ते आणि वाटेल तसे खातो. विविध पावडरी आणि औषधे यांचा सुळसुळाट झालेला दिसतो. सर्व लोकांना एकसारखी आहारपद्धती लागू होऊ शकत नाही, हा मूलभूत सिद्धांत समजून न घेता दिलेल्या ट्रिटमेंट्‌स अपयशी होतात.

औषधोपचार
लठ्ठपणा विरघळण्यासाठी कुठलीही जादूची गोळी अस्तित्वात नाही. हे सत्य समजून घेतले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेने काही परिणामकारक औषधांवर कायमची बंदी घातली आहे याचे कारण म्हणजे त्यांचे जीवघेणे (अक्षरशः) दुष्पपरिणाम. अशा अतिशय कमी वेळात औषधाने बारीक होणाऱ्या, लठ्ठपणा विरघळणाऱ्या कुठल्याही औषधांच्या नादी लागणे निव्वळ आत्मघातकी ठरू शकते.

बेरीयाट्रिक सर्जरी
मेट्रॉबोलीझममधील बरेचसे दोष हे पचन संस्थेद्वारे आटोक्‍यात आणता येतात. जठर आणि लहान आतडे यांच्या रचनेत बदल केल्यानंतर लठ्ठपणा कमी होतो. दुर्बिणीतून केली जाणारी ही एक सुरक्षित, शास्त्रीय उपचारपद्धती असून, लठ्ठपणावर कायमची मात मिळविता येते.

डॉ. जयश्री तोडकर 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)