वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या रुपा हनगंडीचा सुवर्णवेध

पुणे – महाराष्ट्रातील सांगलीची रुपा हनगंडी हिने 21 वर्षाखालील महिलांच्या 59 किलो गटात सोनेरी वेध घेतला. तिने स्नॅचमध्ये 83 किलो वजन उचलताना पश्‍चिम बंगालच्या सुकर्णा आदक हिने नोंदविलेला 81 किलो हा विक्रम मोडला. तिने क्‍लीन व जर्कमध्ये 103 किलो असे एकूण 186 किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक जिंकले.

हरयाणाच्या मोहिनी चव्हाण हिने अनुक्रमे 82 किलो व 99 किलो असे एकूण 181 किलो वजन उचलून रुपेरी कामगिरी केली. आदक हिला येथे ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. तिने स्नॅचमध्ये 81 किलो तसेच क्‍लीन व जर्कमध्ये 96 किलो असे एकूण 177 किलो वजन उचलले.

17 वषार्खालील मुलींच्या 59 किलो गटात आसामच्या दितिमोनी सोनोवाल हिला सुवर्णपदक मिळाले. स्नॅचमध्ये 67 किलो तसेच क्‍लीन व जर्कमध्ये 84 किलो असे एकूण 151 किलो वजन उचलले. तामिळनाडूची वाय. पूर्णाश्री हिने 146 किलो वजन उचलीत रौप्यपदक मिळविले तर तेलंगणाच्या व्ही.साहिथी हिला ब्रॉंझपदक मिळाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)