वेटरमधील वादातून एकाचा खून

पिंपरी – वाद विकोपाला गेल्यामुळे एका वेटरने दुसऱ्या साथीदार वेटरचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 7) सकाळी साडेअकराच्या सुमारास स्पाईन रोडजवळ नानश्री हॉटेल येथे उघडकीस आली.

ज्ञानेश्वर अंकुश गवळी (वय-20, रा. नानाश्री हॉटेल, वडमुखवाडी, चऱ्होली) असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे. अनिकेत मानसिंग राजपूत आणि अन्य एक अशी आरोपींची नावे आहेत. घटनेनंतर आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर बाळासाहेब दिंडे हे वडमुखवाडी येथील नानाश्री हॉटेल चालवतात. त्यांच्या हॉटेलवर मयत ज्ञानेश्वर आणि आरोपी हे काम करतात. हॉटेलमधील सर्व कामगार एकाच खोलीत राहतात. ज्ञानेश्वर आणि आरोपी यांच्यामध्ये गुरुवारी (दि. 6) रात्री जेवणाच्या वेळी किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यानंतर रात्री हॉटेल बंद केल्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी गेले असता रात्री साडेबाराच्या सुमारास पुन्हा भांडण झाले. यावेळी आरोपींनी ज्ञानेश्वर याला लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत ज्ञानेश्वर गंभीर जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला.

हॉटेल चालक शेखर दिंडे हॉटेल उघडण्यासाठी सकाळी साडेअकराच्या सुमारास आले असता त्यांना हॉटेलमध्ये ज्ञानेश्वर याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. अन्य कामगार हॉटेलवर नव्हते. त्यानुसार त्यांनी तात्काळ दिघी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पिंपरी-चिंचवड शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलिसांची पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. अंकुश गवळी हा मूळचा जालना येथील असून तो कामासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आला होता. तो हॉटेलमध्येच रहात असे. त्याला वडील नसूून त्याची आई गावी जालना येथे असते.

मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी क्रुरतेचा कळस
रॉडने झालेल्या मारहाणीत गवळी याचा खून झाला. हे आरोपीच्या लक्षात येताच त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. त्यांनी यासाठी चाकूच्या सहाय्याने गवळी याचे मुंडके कापण्यास सुरुवात केली. त्यांनी त्याचे मुंडके कापून 200 मीटर अंतरावर नेले. मात्र त्यांना पुढे शरिराचे तुकडे करणे जिकीरीचे वाटले व त्यांनी अर्धवट कापलेला मृतदेह तेथेच टाकून पळ काढला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)