वेटरने महिलेच्या श्रीमुखात लगावली

पिंपरी – वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबासोबत आलेल्या महिलेला जेवण करण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे महिलेने जेवण पार्सल करून देण्यास सांगितले. यावरून चिडलेल्या वेटरने महिलेशी अश्‍लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या आईच्या कानशिलात लगावली. ही घटना तळेगाव दाभाडे येथील हॉटेल बगीचा येथे घडली.

पीडित महिलेने याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वेटर किरण पाटील आणि अन्य तीन वेटर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 19) फिर्यादी महिला त्यांच्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील हॉटेल बगीचा येथे आई, वडील, भाऊ यांच्यासोबत गेल्या होत्या. वाढदिवस साजरा करत असताना त्यांना जेवण करण्यास उशीर झाला. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यामुळे त्यांनी हॉटेल मधील वेटरला जेवण पार्सल करून देण्यास सांगितले.

त्यावरून चिडलेल्या वेटरने “”आत्ता रात्रीचे बारा वाजले आहेत. आम्ही कोणाच्या बापाचे ऐकणार नाही”, असे म्हणून फिर्यादी महिलेच्या आईच्या कानशिलात लगावली. फिर्यादी वेटरला याबाबत जाब विचारला असताना इतर वेटरने मिळून फिर्यादी महिलेला शिवीगाळ व दमदाटी करत अश्‍लील वर्तन करून विनयभंग केला. तळेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)