वेग मर्यादा ओलांडल्यास हजार रुपयांचा दंड अटळ

File photo

एक्‍स्प्रेस-वे : स्पीड कॅमेरांद्वारे होणार कारवाई

पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी तसेच बेशिस्त वाहनचालकांच्या वेगाला आवर घालण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून स्पीड कॅमेराद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. महामार्ग पोलिसांनी नुकतीच खालापूर परिसरात या कॅमेऱ्यांची चाचणी घेतली असून ती यशस्वी ठरली आहे. त्यामुळे आता लवकरच संपूर्ण महामार्गावर हे कॅमेरे कार्यान्वित केले जाणार आहेत. जर वाहनचालकाने वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.

-Ads-

द्रुतगती महामार्गावर आतापर्यंत 5 हजारांहून अधिक अपघात झाले असून त्यामध्ये दीड हजार जणांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासंदर्भात उपाययोजनांची सातत्याने चर्चा केली जाते. गेल्या दोन वर्षांपासून द्रुतगती महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम कार्यान्वित करण्याचा विचार राज्य सरकारचा सुरू आहे. त्यानुसार राज्य सरकारने नुकतेच यासाठी पहिले पाऊल उचलले असून त्यासाठी सल्लागाराची नेमणूक केली आहे. एकीकडे या सल्लागार संस्थेशी उपाययोजनांबाबत चर्चा सुरू असताना, दुसरीकडे स्पीड कॅमेरांद्वारे कारवाई सुरू केली आहे.

द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे फोटो या कॅमेराद्वारे काढण्यात येणार आहे. हे फोटो काढताना त्या वाहनाचा साधारण वेग किती असेल, हेदेखील टिपले जाणार आहे. वाहनाचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर त्या वाहनाचा फोटो पुढील टोलनाक्‍यावर पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. वाहन टोलनाक्‍यावर पोहोचताक्षणी तो फोटो वाहन चालकाला देण्यात येईल व त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)