वेगाने वाढणाऱे ग्रामीण अर्थकारण नव्या वळणावर (भाग-१)

विकसित होणाऱ्या ग्रामीण भारतात गुंतवणुकीच्या नव्या संधी

ग्रामीण भागातील ग्राहक आणि अर्थव्यवस्था याचा थेट संबंध फारसा जोडला जात नव्हता, कारण त्यांच्याकडून उलाढाल कमी होत होती. पण आता ती लक्षणीय वाढल्याने त्या ग्राहकशक्तीवर गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.

आजच्या घडीला भारतातील गावे ही शहरांचे अनुकरण करू लागली आहेत. शहरांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागली आहेत. आज अगदी टूथपेस्टपासून ते डिओडरंटपर्यंत आणि ब्रँडेड कपड्यांपासून ते सर्व प्रकारच्या वाहनांना ग्रामीण भागात मागणी आहे. गावात राहणाऱ्या नव्या पिढीला या सगळ्या गोष्टी हव्या आहेत. त्यामुळेच सर्व सुविधांनी युक्त घरे, आधुनिक बँकिंग सोयी, दळणवळणाच्या सुविधा, मोबाईलद्वारे संपर्कक्रांती या सगळ्या गोष्टी ग्रामीण भारतात दिसू लागल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

१९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून भारताची ओळख शेतीप्रधान देश अशी आहे. ७१ वर्षांनंतर आजही आपली अर्थव्यवस्था ग्रामीण भारतातील वाढते उद्योग-व्यवसाय आणि मागणीच्या जोरावर मजबुतीने व वेगाने वाढत आहे. जवळपास दोन तृतीयांश लोकसंख्या आजही ग्रामीण भागात वास्तव्य करते. भारतात सहा लाखांहून अधिक खेड्यांमध्ये राहणारे भारतीय आपल्या दैनंदिन जीवनात वेगाने बदल घडवत आहेत. अगदी कुठल्याही गावामध्ये आपल्याला हा बदल दृश्य स्वरुपात दिसतो. वीस वर्षांपूर्वीची गावातील स्थिती आणि आजचे गावाचे बदलेलेल रुप लक्षात घेतले तर ग्रामीण अर्थकारणाच्या दृष्टीने झालेले सकारात्मक ठऴक बदल लक्षात येतात. शाळांचे बदललेले स्वरुप, सरकारी बँकांबरोबरच खासगी बँकांनी गावांमध्ये केलेला प्रवेश, बाजारपेठेचे आणि दुकांनांचे बदललेले रुप, वाढलेली वाहतुकीची साधने, गावातील वाढलेली आर्थिक उलाढाल हे सगळे बदल ग्रामीण अर्थव्यवस्थेत सकारात्मक आणि वेगाने वाढ होत असल्याचे दाखवत आहेत.

वस्तू व सेवा यांची खरेदी करण्याची क्षमता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अनेक कंपन्या ग्रामीण बाजारपेठेमध्ये नियोजनपूर्वक प्रवेश करत आहेत. पारंपारिक वस्तू व सेवांसोबत नवनवीन व अद्यावत वस्तू व सेवांची मागणी ग्रामीण भागात वाढत आहे. परदेशी तसेच भारतीय उत्पादक आपल्या वस्तू व सेवा ग्रामीण भागात नेण्यासाठी मोठमोठाली मेगास्टोअर्स उघडत आहेत.

वेगाने वाढणाऱे ग्रामीण अर्थकारण नव्या वळणावर (भाग-२)

भारतीय उत्पादकांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रासारख्या अनेक कंपन्या ग्रामीण भागातील मागणीची नेमकी गरज ओळखून ग्रामीण अर्थकारण समजून घेत आपली उत्पादने व सेवा ग्रामीण भागात पोचवत आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा ही ट्रॅक्टर उत्पादन क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. शेती अवजारे, शेतमालाची खरेदी विक्री, ट्रॅक्टर्स, ट्रक्स, ग्रामीण वित्तपुरवठा, ग्रामीण तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठमोठ्या कंपन्या कामकाजाचा पसारा वाढवत आहेत. ग्रामीण भागातील भांडवली गरजा लक्षात घेऊन अनेक उद्योजकांनी वित्त पुरवठा करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये, घराचे बांधकाम-दुरुस्ती, शेती उत्पादनाच्या वाहतुकीसाठी लागणाऱ्या सुविधा, शेती अवजारांच्या खरेदी या सगळ्या बाबींसाठी भांडवल पुरवठा करण्याच्या कामात अनेक बँका तसेच बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी आघाडी घेतली आहे. यामुळे ग्रामीण भागात पैशाचे आदानप्रदान वाढले आहे व ग्रामीण भागातील व्यवसाय-उद्योगांना उठाव आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)