वेगवेगळ्या राजकिय नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तऱ्हा

वेगवेगळ्या राजकिय नेत्यांच्या
वेगवेगळ्या प्रकारच्या तऱ्हा
शोधूनही गवसत नाही खरा
दुर्दैव हे कि एकही नाही बरा

स्वार्थीपणा करणाऱ्यांची
लोकहो तुम्हीच मानगुट धरा
न्यायालयात प्रकरणे प्रलंबित
कुणीतरी त्वरित न्याय करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सत्ता अन पराकोटीचा स्वार्थ
यालाच मानले जाते राजकारण
राजकारण्यांकडून सामान्यजन
अपेक्षा का ठेवतात विनाकारण

राजकीय साठमारीत सर्वत्र
सर्वसामान्यजणांची अवस्था भीषण
आजी माजी सारेच बकासुर
एकमेकांना देताहेत दुषण

नेत्यांनीच बदनाम केलंय
महात्मा गांधीजींचे उपोषण
पुढारी खाऊन खाऊन मालामाल
गरीब पोटार्थी जनतेचे कुपोषण

सत्ता मिळाली कि राजकारणी
शासकिय तिजोऱ्या करतात साफ
कुणालाही निवडून दिले तरी
मतदारांना होतोच मनस्ताप

पिढ्यानपिढ्यांची सोय लावणे
हेच सातत्याने आपण पहातो
कार्यकर्त्यांनो आपण उगाचच
का नालायकांच्या पालख्या वहातो

सामान्य कष्टकरी शेतकरी
निधळाच्या घामाचा नहातो
नामदार खासदार आमदार
मोठ्या मिजाशीत कसा रहातो

काहींनी सत्तेत असताना लुटलेले काही नेते जामिनावर सुटलेले
गुंड पुंड लुटारू बदमाश नेते
सर्वसामान्यांच्या जीवावर उठलेले

संघटित झालेल्या समाजाची
नेत्यांना वाटायला हवी भिती
येथून पुढच्या काळात तरी
जनतेची हिच असावी नवी निती
                              – विजय वहाडणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)