वेगवान इंटरनेट सेवा तळागाळापर्यंत पोहोचणार 

नवी दिल्ली: केंद्र टेलिकॉमच्या सुविधा देणाऱ्या कंपन्यांना 5 जी सेवा देण्यासाठी काही स्पेक्‍ट्रमना परवानगी देणार आहे. सरकारकडून ग्रामीण भागातील खेड्यापाडड्यात इंटरनेटची सुविधा नागरिकांना मिळावी यासाठी भारत नेट ही योजना राबवण्यात येणार असून ती योजना लवकरच लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यात 1 कोटी वायफाय पॉईंट बसवण्यात येणार आहेत. तर सरकार याकरिता लवकरच प्रायोगिक तत्त्वावर 5 जी सेवा चालू करणार आहे. यासाठी ठराविक स्पेक्‍ट्रमना लायसन्स मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे.

5 जी सेवा देशातील अतिदुर्गम भागात पोहोचवण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली असून भारताला 2020 मध्ये नेटचे स्पीड शहरी भागात 10 हजार एमबीपीएस आणि ग्रामीण भागाकरिता 1 हजार एमबीपीएस इतके स्पीड देणारी यंत्रणा उभा करून जगभरातील बदलत्या तंत्रज्ञासोबत उभे राहण्याची क्षमता निर्माण होणार आहे. 515.-5250 एमएचझेड, 5470-5725 एमएचझेड या ब्रॅंड्‌सना आपली सुविधा देण्यासाठी सरकारने काही स्पेक्‍ट्रमना हिरवा कंदील दाखवला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)