वेगरेत धनगरवस्त्यांवर ग्रामपंचायतीकडून भांडीवाटप

पिरंगुट-वेगरे (ता. मुळशी) ग्रामपंचायतीच्या वतीने 15 टक्के मागासवर्गीय निधीमधून गावातील मांडवखडक, निर्गुडवाडी व धनवी येथील धनगर वस्त्यांवर सार्वजनिक भांडी संचाचे वाटप करण्यात आले. आदर्श सरपंच भाऊ मरगळे यांचे हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले.
वेगरे गाव हे मुळशी तालुक्‍यातील दुर्गम व डोंगरी भागात असून उपक्रमशील गाव म्हणून ओळख आहे. गावाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. वेगरे गावचे पुनर्वसन झाल्यापासून येथील ग्रामस्थांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी स्वयंपाक करणेसाठी भांड्याची अडचण होती. तसेच कार्यक्रमाप्रसंगी दुसऱ्या ठिकाणावरून भांडी आणावी लागत असे म्हणून याबाबत ग्रामस्थांकडून सातत्याने मागणी होत होती. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांनी याबाबत ग्रामपंचायत 15 टक्के मागासवर्गीय निधीमध्ये तरतूद करून तसा सर्वानुमते निर्णय घेतला व नुकतीच आवश्‍यक ती भांडी खरेदी करून त्याचे वितरण करणेत आले. यामुळे ग्रामस्थांची होणारी अडचण दूर झाली आहे याचे समाधान आहे अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी पोलीस पाटील यमुना मरगळे, ग्रामपंचायत सदस्य राम मरगळे, राम बावधाने, फुलाबाई ढेबे, शशिकला मरगळे, बमाबाई बावधाने, ग्रामसेवक विजयकुमार अडसूळ, राजेंद्र जोशी, मलिक कोकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup: Thumbs up
6 :heart: Love
3 :joy: Joy
6 :heart_eyes: Awesome
5 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)