वेंकय्या नायडू भाजपचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने शहरी विकास मंत्री वेंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकय्या नायडू उद्या अकरा वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार हा दक्षिणेतून असावा अशी संघाची इच्छा होती. उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती असल्यामुळे सभागृह चालविण्याची क्षमता असली पाहिजे कारण राज्यसभेत सरकार अल्पमतात आहे.
विशेष म्हणजे व्यंकय्या नायडूंच्या नावाला संघाने आधीच संमती दर्शविली होती. व्यंकय्या नायडू हे आंध्र प्रदेश म्हणजेच दक्षिणेतून येतात. तिथे भाजपाला चांगला असा जनाधार नाही. त्यामुळे दक्षिणेत स्वतःची बाजू भक्कम करण्यासाठी भाजपाकडे याहून चांगली संधी नाही. सुरुवातीला भाजपा दक्षिणेतील कोणत्याही नेत्याला उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरवू शकते, अशी चर्चा होती. महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांचे नाव सुध्दा शर्यतीत होते.

मात्र आता उपराष्ट्रपतिपदासाठी व्यंकय्या नायडू यांच्याहून योग्य चेहरा असू शकत नाही, असंही भाजपाच्या धुरिणांना वाटतं. व्यंकय्या नायडू हे संघाचे कार्यकर्ते आहेत. भाजपामध्ये त्यांच्याकडे मोठा आणि जाणकार नेता म्हणून पाहिलं जातं. ब-याचदा भाजपा पक्ष अडचणीत सापडलेला असताना व्यंकय्या नायडू बचावासाठी पुढे येऊन पक्षाची बाजू भक्कमपणे मांडताना पाहायला मिळतात. त्याप्रमाणेच सर्वपक्षीयांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)